CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

CM Vijay : तामिळनाडूत विजय यांच्या TVK पक्षाने नीट परीक्षेसंदर्भात एकदम वेगळी भूमिका मांडली आहे. सध्या देशात या मुद्यावरुन मोठा गदारोळ, आंदोलनं सुरु आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आहे. त्यामुळे देशातील विरोधी पक्ष संतापले आहेत.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
Vijay
| Updated on: Jul 22, 2026 | 1:38 PM

सध्या देशभरात नीट पेपर फुटीवरुन मोठा गदारोळ सुरु आहे. दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच मोठं आंदोलन सुरु आहे. या संदर्भात तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाने एक वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांचा टीव्हीके पक्ष फक्त नीट परीक्षेतील अनियमितते विरोधातच नाहीय, तर मेडीकल एन्ट्रन्स टेस्ट नीट परीक्षा रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. वैद्यकीय परीक्षेसंदर्भात सर्वाधिकार राज्यांना द्यावेत अशी TVK ची मागणी आहे. टीव्हीकेची या मुद्यावर एकदम ठाम भूमिका आहे. आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही, आम्ही ठाम आहोत. राष्ट्रीय स्तरावरील एन्ट्रन्स टेस्ट रद्द करावी. यावर उपाय म्हणून, शिक्षण हा विषय संविधानातील समवर्ती सूचीतून काढून राज्य सूचीत समाविष्ट करावा अशी TVK ची मागणी आहे.

टीव्हीकेने आपल्या स्टेटमेंटमध्ये नाव न घेता मुख्य विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकला लक्ष्य केलं. मत मिळवण्यासाठी फसवणुकीचं खोट राजकारण करणार नाही अशी विजय यांची भूमिका आहे. 2021 विधानसभा निवडणुकीआधी द्रमुकने सत्तेवर आल्यास आपण नीट परीक्षा रद्द करु असं निवडणूक काळात आश्वासन दिलेलं. यामध्ये शिक्षणाचा सर्वाधिकार राज्यांना मिळू शकतो. कायमस्वरुपी आणि अंतरिम तोडगा म्हणून हा आमचा दृष्टीकोन आहे. आमचे नेते विजय यांनी आधीच हा मुद्दा मांडला आहे असं टीव्हीकेने म्हटलय.

विजय यांच्या रुपाने एक नवीन पर्याय

मे महिन्यात तामिळनाडूच्या राजकारणात मोठा उलटफेर पहायला मिळाला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या अभिनेता विजय यांच्या टीव्हीकेने तामिळनाडूत सत्ता मिळवली. तामिळनाडूचं राजकारण बरीच वर्ष द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्याभोवती फिरत होतं. लोकांना विजय यांच्या रुपाने एक नवीन पर्याय मिळाला.

अजून या नात्यावर काही भाष्य केलेलं नाही

विजय आपल्या अभिनयाने लोकांच्या मनावर राज्य करतात. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच विजय यांना तामिळनाडूचं सत्तापद मिळालं. विजय यांचं नाव अभिनेत्री त्रिशा कृष्णन सोबत जोडलं जातं. दोघांनी अजून या नात्यावर काही भाष्य केलेलं नाही. व्यक्तीग आयुष्यात विजय यांच्या घटस्फोटाचा खटला सुरु आहे.

Follow Us