केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, थेट चांदी होणार स्वस्त, तब्बल..
सोने आणि चांदीच्या भावात मागील काही दिवसांपासून मोठे चढउतार बघायला मिळत आहेत. त्यातच केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला. चांदी आणि सोने खरेदीबद्दल सरकारकडून सतत भूमिका बदलली जात आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी देशातील जनतेला आवाहन करत सोने खरेदी न करण्यास सांगितले. यासोबतच त्यांनी सोन्यावरील ड्युटी वाढवली. त्यांनी ड्युटीत मोठी वाढ केली. त्यातच आता देशात दिवाळी आहे. दिवाळीत सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला. भारतात पुढच्या सहा महिन्यात चांदीच्या 6500 टन मॅट्रिक्स टन आयातीला मंजुरी देण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात चांदीच्या मागणीची पूर्तता केली जावी, याकरिता हा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात चांदीची आयात केली जाते. भारतात चांदी खरेदी करणारे सर्वाधिक ग्राहक आहेत. भारत जवळपास 80 टक्के चांदीची आयात विदेशातून करतो.
पुढील सहा महिन्यांकरिता चांदीच्या आयातीकरिता मंजूरी मिळाली आहे. सरकारने एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदीच्या आयातीकरिता परवानगी दिली आहे, ज्यामुळे आर्श्चय व्यक्त केले जात आहे. त्यातच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. चांदीचे दर घसरत असल्याने लोकांकडून चांदीची मोठी खरेदी केली जाऊ शकते, तसे संकेत आहेत.
केंद्र सरकारकडून चांदीच्या आयातीवर निर्बंध घातली होती. आयातीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागणार. त्यातच आता ही मोठी सूट सरकारकडून देण्यात आली. इराण आणि अमेरिका युद्धात इतर देशांकडून कच्चे तेल भारतात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर खर्च होत होती. ज्यामुळे देशाच्या परकीय चलनावर मोठा दबाव वाढला. ज्यानंतर सरकारने काही महत्वाची पाऊले उचलली.
परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. आता पुन्हा चांदीच्या आयातीवरील निर्बंध त्यांनी काढली आहेत. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी खरेदी केली जाते. त्यातच सोने आणि चांदीचे भाव कोसळताना दिसत आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात चांदी आणि सोन्याची खरेदी ग्राहकांकडून केली जाऊ शकते. दिवाळीच्या तोंडावर भाव वाढण्याची शक्यता असताना आता भाव कमी होत आहेत.