सरकारला अडचणीत आणणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीसमोर संकटाचा मोठा डोंगर, थेट..

सीजेपीने मोठे आंदोलन पुकारले. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात हे आंदोलन होते. त्यातच सीजेपीला मोठा धक्का बसला. हायकोर्टाने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या अटकेच्या सुनावणीदरम्यान चांगलेच फटकारले. काही बॉन्डवर सह्या साैरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याकडून घेण्यात आल्या.

सरकारला अडचणीत आणणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीसमोर संकटाचा मोठा डोंगर, थेट..
Saurav Das Ashutosh Ranka Abhijeet Dipke
| Updated on: Oct 22, 2026 | 3:00 PM

कॉकरोच जनता पार्टीसमोरील अडचणी काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 10 ऑक्टोबरपासून त्यांनी दिल्ली आंदोलन पुकारले, पण समस्या अधिक वाढत आहेत. सीजेपीचे बडे नेते साैरभ दास आणि आशुतोष रांका जेलमध्ये राहिल्यानंतर बाहेर आले पण समस्या अधिक वाढत आहेत. त्यांच्या विरोधातील दोन एफआयआरची चाैकशी दिल्ली क्राइम ब्रॅचकडून केली जातंय. दुसरीकडे एकापेक्षा जास्त बॉन्डवर सह्या करून शांती राखणार असल्याचे त्यांनी मान्य केले. यामुळे पुढील काही दिवसात मोठ्या 4 अडचणीचा सामना सीजेपीला करावा लागणार आहे. सर्वात महत्वाची पहिली समस्या म्हणजे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आंदोलन यशस्वी झाले.

पण ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आंदोलनापूर्वीच कायदेशीर कचाट्यात सीजेपीचे नेते अडकले. अभिजीत दिपके, साैरभ दास आणि आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे हे कायद्याच्या कचाट्यात अडकले. या सर्वांना अटी घालून दिल्या आणि बॉन्डवर सह्या घेतल्या. त्यानंतरच त्यांची सुटका करण्यात आली. 10 ऑक्टोबर रोजी साैरभ दास, आशुतोष रांका आणि अभिजीत दिपके यांना पोलिसांनी अटक केली.

Loading...

तिघांनाही 50-50 हजारांच्या बॉन्डवर लिहून घेतले की, पुढील 1 वर्ष शांती ठेवतील. मात्र, त्यानंतर साैरभ दास, आशुतोष रांका यांनी जंतरमंतरवर जाण्याचा प्रयत्न केला, ज्यानंतर त्यांनी रवानगी थेट जेलमध्ये केली. यावेळीही देखील त्यांना जेलच्या बाहेर थेट अनेक अटी आणि शर्यती ठेऊन सोडण्यात आले. आता जर त्यांनी हे नियम तोडले तर त्यांच्यापुढे मोठी समस्या उभी राहू शकते.अभिजीत दिपके यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करण्यास सांगितले.

ज्यामुळे सीजेपी पुढे मोठे आव्हान असणार आहे की, मोठ्या कोणत्याही आंदोलनाशिवाय कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्याचे मोठे आव्हान सीजेपी पुढे आहे. सीजेपीला मोठे आंदोलनही करायचे आहे, पण त्यांच्यासमोर मोठ्या समस्या देखील आहेत. सीजेपीने नीट पेपरफुटीत मोठा लढा उभा केला. पण ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलन तोच लढा उभारण्यात त्यांना अपयश मिळाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us