मोठा आवाज आणि वैष्णो देवी स्पेशल ट्रेनचे थेट दोन भाग झाले,दैव बलवत्तर म्हणून 1200 प्रवासी वाचले…
रेल्वे अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपास सुरु केला. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पंजाबच्या लुधियाना रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी मोठा रेल्वे अपघात सुदैवाने टळला. वैष्णो देवी जाणाऱ्या नवी दिल्ली – श्री माता वैष्णोदेवी काटरा स्पेशल ट्रेनचा कोचचे कपलर तुटल्याने हा कोच ट्रेनपासून वेगळा झाल्याची घटना घडली. हा अपघात ट्रेन स्थानकातून निघत असतानाच झाला. मात्र,या ट्रेनमध्ये १२०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत होते.जर ट्रेन वेगात असताना हे कपलर (दोन डब्यांना जोडणारा सांधा ) तुटले असते तर मोठा भीषण अपघात घडला असता असे म्हटले जात आहे.
पंजाबच्या लुधियाना रेल्वे स्थानकात शनिवारी मोठा अपघात थोडक्यात टळला. वैष्णो देवीला जाणाऱ्या सुमारे १२०० प्रवाशांनी भरलेल्या न्यू दिल्ली-श्री माता वैष्णो देवी काटरा स्पेशल ट्रेनच्या एका कोच अचानक सोबतच्या कोचपासून वेगळा झाला. घटनेवळी त्यामुळे जोरदार आवाज आल्याने प्रवाशांमध्ये अफरातफरी माजली आणि लोक घाबरुन कोचच्या बाहेर पडले.
मिळालेल्या माहितीनुसार न्यू दिल्ली-श्री माता वैष्णादेवी काटरा स्पेशल ट्रेन (04081) शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजता नवी दिल्लीहून रवाना झाली होती. सकाळी ८.४७ वाजता ट्रेनमध्ये लुधियाना रेल्वे स्थानकावर पोहचली. या निर्धारित थांब्यानंतर ट्रेन जशी पुढे स्थानकातून निघाली, तसा अचानक एका स्लीपर कोचमधून जोरदार आवाज झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आवाज इतका मोठा होता की प्रवाशांना वाटले मोठा स्फोट झाला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही वेळानंतर कोचचा कपलर तुटल्याने दोन कोच वेगळे झाल्याने हा प्रकार घडला. यानंतर ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये दहशत पसरली.
स्टेशनवर अफरातफर, प्रवाशी घाबरुन बाहेर पडले
अपघातानंतर अनेक आपआपल्या कोचमधून बाहेर पडले. प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. काही काळ स्थानकावर मोठी घबराट पसरली. मात्र ट्रेन नुकतीच स्थानकातून बाहेर पडत असल्याने ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा हानी टळली.
जर ट्रेन वेगात असताना कोच कपलर तुटले असते तर स्थिती जास्त भयंकर होऊ शकली असती.त्यामुळे थोडक्यात प्रवाशांचे प्राण बचावल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले. अधिकाऱ्यांनी क्षतिग्रस्त कोच आणि ट्रेनच्या अन्य भागाचे निरीक्षण केले आणि दुरुस्तीचे काम सुरु केले.
ADCP समीर वर्मा म्हणाले कपलर तुटले
ट्रेन जेव्हा स्थानकातून निघत होती तेव्हा दोन डब्यांना जोडणार कपलर तुटले. यामुळे एक डब्बा दुसऱ्या डब्यापासून वेगळा झाला. हा तांत्रिक बिघाडाने हा अपघात झाल्याचे लुधियानाचे ADCP समीर वर्मा यांनी सांगितले.
DRM म्हणाले 15 वर्षे जुना डबा
फिरोजपूर डिव्हीजनचे DRM संजीव कुमार यांनी सांगितले की रेल्वेच्या एका सामान्य कोचचे आयुष्यमान सुमारे २५ वर्षे मानले जाते. ज्या डब्याशी संबंधित ही घटना घडली त्याचे वय सुमारे १५ वर्षे आहे. तपासानंतर स्पष्ट होईल कपलरमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड होता का ? वा कोणत्या अन्य कारणाने ही घटना घडली.
प्रवाशांना आला आधीच संशय
वैष्णो देवीला जाणाऱ्या प्रवाशांनी दावा केला की संबंधित डब्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ट्रेनला जोडण्यात आले होते. डब्याची ही अवस्था पाहून आम्हाला आधीच संशय आला होता असेही प्रवाशांनी म्हटले आहे.