Har Ghar Tiranga : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे ‘हे’ राष्ट्रप्रेम..! पतीचा आधार अन् वद्ध महिलेचे कष्ट, अखेर छतावर लावलाच तिरंगा

| Updated on: Aug 14, 2022 | 11:07 PM

आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर केला आहे,  त्यामध्ये, वृद्ध पती-पत्नी हे छतावर आहेत. ही वृद्ध महिला लोखंडी ड्रमवर चढून लोखंडी रॉडवर झेंडा लटकवताना दिसत आहे. खाली तिचा नवरा आपल्या बायकोला आधार देता यावा म्हणून त्या बॅलरला धरुन उभा आहे. वयाची आणि खाली पडण्याची कसलीही तमा न करता वृद्ध महिला ही झेंडा लटकवण्यात व्यस्त आहे.

Har Ghar Tiranga : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे हे राष्ट्रप्रेम..! पतीचा आधार अन् वद्ध महिलेचे कष्ट, अखेर छतावर लावलाच तिरंगा
हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग नोंदवून वद्ध दाम्पत्यांने राष्ट्राबदद्लचे प्रेम दाखवून दिले आहे.
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई :   (Independence Day) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्राबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण व्हावा हा यामागचा उद्देश आहे. मात्र, एका आजीबाईने घराच्या छपरावर (flag hoisting) झेंडा लावण्यासाठी केलेले कष्ट आणि त्यांना मिळालेला पतीचा आधार हे पाहिले तर हर घर तिरंगा या मोहिमचा उद्देश साध्य झाल्याची भावना ही मनात येतेच. हर घर तिरंगा या मोहिमेत आता सेलिब्रेटी ते राजकीय नेते सहभागी झाले आहेत पण सध्या चर्चा आहे ती (Anand Mahindra) उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटची. त्यांनी एका वयस्कर जोडप्याचा तिरंगा छतावर लावतानाचा फोटो शेअर केला आहे, ज्याला नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला फोटो हा बोलका असून त्यापेक्षा त्यामधून बोधही घेण्यासारखा आहे. हो फोटे शेअर करीत लिहले आहे की, “जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की यावेळी स्वातंत्र्य दिनाबद्दल इतका उत्साह का केला जात आहे, तर या दोन लोकांना उत्तर विचारा. हे लोक तुम्हाला कोणत्याही प्रकारे न बोलता चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतील. जय हिंद.”

वृद्ध दाम्पत्याकडून गच्चीवर ध्वजारोहण

आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर केला आहे,  त्यामध्ये, वृद्ध पती-पत्नी हे छतावर आहेत. ही वृद्ध महिला लोखंडी ड्रमवर चढून लोखंडी रॉडवर झेंडा लटकवताना दिसत आहे. खाली तिचा नवरा आपल्या बायकोला आधार देता यावा म्हणून त्या बॅलरला धरुन उभा आहे. वयाची आणि खाली पडण्याची कसलीही तमा न करता वृद्ध महिला ही झेंडा लटकवण्यात व्यस्त आहे. वयस्कर असूनही झेंड्यावर आणि देशाबद्दलचं असं प्रेम पाहण्यासारखं आहे. फोटोत दिसणारे लोक त्या पिढीचे आहेत ज्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ आजच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळा होता.त्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी देश स्वतंत्र होताना पाहिला होता, त्यामुळे त्यांच्या भावना आपल्या सर्वांपेक्षा जास्त असतील.

काय आहेत जनतेच्या प्रतिक्रिया?

आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर करताच लाईतकचा अक्षरश: पाऊसच पडत होता. अवघ्या काही वेळात 7 हजाराहून अधिक व्ह्यूव तर 800 हून अधिकांनी रिट्विट केले होते. तर अनेकांनी अशा प्रकारे अभिमान निर्माण होईल असे फोटे शेअर केले आहेत. याशिवाय अनेक तरुणांनी कमेंटमध्ये झेंडासोबतचा आपला फोटोही शेअर केला आहे. त्याचबरोबर कमेंट सेक्शनच्या व्हिडीओमध्ये वृद्ध महिला घरातील सोफ्यावर बसून झेंडा हातात घेतलेले फोटो शेअर केले आहेत.