Vinayak Mete : उद्या बीडची बाजारपेठ बंद, 10 वाजता मेटेंच्या अंत्ययात्रेला सुरवात अन् शासकीय इतमात होणार अंत्यविधी

अंत्यसंस्कार हे शासकीय इतमात होणार असल्याने नातेवाईकाव्यतिरिक्त इतर कोणालाही अंत्य यात्रेदरम्यान अंत्यदर्शन घेता येणार नाही. त्यामुळे शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Vinayak Mete : उद्या बीडची बाजारपेठ बंद, 10 वाजता मेटेंच्या अंत्ययात्रेला सुरवात अन् शासकीय इतमात होणार अंत्यविधी
विनायक मेटेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 10:21 PM

बीड :  (Vinayak Mete) शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. मुंबईतून त्यांचे पार्थीव आता बीडकडे रवाना झाले असून सोमवारी (Beed) बीड येथील उत्तम नगरातील त्यांच्या शेतामध्ये पार्थिवावर (Extreme rites) अत्यंसंस्कार होणार आहेत. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने उद्या 15 ऑगस्ट रोजी बीड जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून सर्व व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवून मेटे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष सोहनी आणि बीड शहर अध्यक्ष विनोद पिंगळे व इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.

अशी असणार आहे अंतयात्रा

सोमवारी दुपारी 3.30 वाजता बीड येथील जालना रोडवरील उत्तम नगरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागील सिध्दीविनायक पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्य यात्रेदरम्यान अंत्यदर्शन घेता येणार नाही.त्यामुळे शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता अंत्ययात्रेला सुरूवात होणार आहे. शिवसंग्राम भवन – छत्रपती शिवाजी महाराज स्मारक- कारंजा चौक – बलभीम चौक – माळवेस चौक – सुभाष रोड – अण्णाभाऊ साठे चौक – शाहूनगर – अंबिका चौक – अंत्यविधी स्थळ. यादरम्यान अंत्ययात्रा मार्ग असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत.

शासकीय इतमात अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कार हे शासकीय इतमात होणार असल्याने नातेवाईकाव्यतिरिक्त इतर कोणालाही अंत्य यात्रेदरम्यान अंत्यदर्शन घेता येणार नाही. त्यामुळे शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसंग्राम भवन येथेच नागरिकांनी साहेबांचे अंतिम दर्शन घ्यावे असे आवाहन शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशीद यांनी केले आहे. बीड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी केली जात आहे.

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विनायक मेटे यांचे संबंध अधिक जवळचे होते. शिवाय मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे यांनी वेळोवेळी आवाज उठविलेला आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाले आहे. सोमवारी दुपारी 4 च्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी राज्य भरातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते तर दाखल होतीलच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.