Gold Rate Today : उच्चांकापेक्षा सोने स्वस्त, सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल, तब्बल..
Gold Rate Today : इराण आणि अमेरिका युद्धात सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच आजचा सोन्याचा भाव पुढे आलाय. यादरम्यान सोने आणि चांदीच्या भावात मोठे बदर झाल्याचे बघायला मिळतंय.

इराण आणि अमेरिका युद्धात सतत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये चढउतार बघायला मिळत आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला इराणवर अमेरिका आणि इस्त्रायलने केला. तेव्हापासून सोने आणि चांदीच्या किमती सतत घसरत आहेत. अनेकांनी सोने खरेदी करण्यावर भर दिला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकिय चलनावरील दबाव कमी करण्याकरिता सोन्याची खरेदी पुढील 1 वर्षाकरिता न करण्याचे आवाहन केले. सोने स्वस्त झाल्याने खरेदी करण्यावर लोकांच एकच दणका होता. इराण अमेरिका युद्धापूर्वी सोन्याचे भाव दोन लाखाच्या आसपास पोहोचले होते. पण जसाही अमेरिकेने इराणवर हल्ला केला तसे सोने घसरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतरही सोन्याचे भाव कमी होताना दिसले. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत थेट सोन्यावरील 6 टक्के आयात कर वाढून थेट 15 टक्के केला. ज्यामुळे भारतीय सराफा मार्केटमध्ये सोन्याचे भाव गगणाला पोहोचले.
इराण आणि अमेरिका युद्ध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर सतत भावात बदल होत आहेत. आता नुकताच आजचा सोने आणि चांदीचा भाव पुढे आला. आजही सोने त्याच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. सोने आणि चांदीच्या भावात वाढ झालीये. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेलीये.
सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 62 हजार 225 रुपये तर चांदीचे दर जीएसटीसह सह 2 लाख 78 हजार 100 रुपयांवर गेले. अमेरिकेने इराणला युद्ध संदर्भात तडजोड करण्यासाठी आणखी एक संधी दिल्याने त्याचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाल्याची सुवर्ण व्यवसायिकांचे म्हणणे आहे.
आज गुरुपुष्यामृत योग असल्याने त्या मुहूर्तावर झालेली वाढ खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री देणारी आहे. आज ग्राहक मोठ्या संख्येने सोने आणि चांदीची खरेदी करतात. पण भावात वाढ झाली आहे. इराण आणि अमेरिका युद्धात काही मोठी घोषणा झाली की, सोन्याच्या भावात वाढ होते. युद्धादरम्यान सोन्यात मोठी घसरण नोंदवण्यात आलीये.