आता या चलनी नोटा बदलणार, RBI चा सर्वात मोठा निर्णय, कारण काय?
भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. टेडंर देखील जारी करण्यात आलं आहे. यासाठी एका भारतीय तर दोन विदेशी कंपन्यांनी बोली लावली आहे. आरबीआयकडून त्यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. दहा आणि वीस रुपये या सारखे छोटे मूल्य असलेल्या नोटा छापण्यासाठी आता कागदाऐवजी प्लॅस्टिकचा वापर करण्यात येणार आहे. नोटा जास्तीत जास्त टिकाव्यात हा त्या मागचा उद्देश आहे. या योजनेवर आरबीआयकडून विचार सुरू आहे. ही प्रक्रिया सध्या टेंडर, सॅम्पल, आणि टेस्टिंगच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर आता आरबीआयच्या मालकीची कंपनी असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (BRBNMPL) ने टेंडर जारी केलं आहे. या टेंडरसाठी एका भारतीय कंपनीने आणि दोन विदेशी कंपन्यांनी बोली लावली आहे. मात्र या नोटा छापण्यासाठी यावेळी आता आरबीआयकडून काही विशेष अटी ठेवण्यात आल्या आहेत.
ज्यामध्ये दोन महत्त्वाच्या अटी ठेवण्यात आल्या आहे, एक म्हणजे ज्या कंपनीला टेंडर मिळेल त्या कंपनीला सर्वात आधी एक प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे, ज्यामध्ये त्यांना असं डिक्लेअर करावं लागेल की, त्यांचं भारतामधील काम हे चीन किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही उपक्रमापासून अलिप्त ठेवावं लागणार आहे, आणि दुसरी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे या नोटा छापण्यासाठी जे पॉलिमर वापरं जाणार आहे, त्या पॉलिमरमध्ये कोणत्याही प्राण्याची चरबी असता कामा नये, प्राण्याची चरबीयुक्त पॉलिमर नोटा छापण्यासाठी वापरता येणार नाहीये.
तसेच त्यानंतर या कंपनीला आपल्या कामाचे काही सॅम्पल आरबीआयकडे जमा करावे लागणार आहेत. या नोटा भारतामधील विविध वातावरणात तपासल्या जाणार आहेत. भारतामधील विभिन्न वातावरणात या नोटा किती टिकावू आहेत, हे आधी तपासलं जाणार आहे. तसेच बदलत्या वातावरणाचा त्यावर काही परिणाम होतोय का? हे देखील तपासलं जाणार आहे. एका रिपोर्टनुसार यासाठी तीन कंपन्यांनी बोली लावली आहे, ज्यामध्ये एक भारतीय तर दोन विदेशी कपंन्या आहेत. भारतामधील सर्वात मोठी कंपनी BOPP (बायऐक्शली ओरिएंडेट पॉलीप्रोपाइलीन) एक्सपोर्ट कंपनी कॉस्मो फर्स्टचा समावेश आहे. प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.