ही वनस्पती म्हणजे सापांचा काळच, घरात लावताच परिसरात लपलेले साप देखील दूर निघून जातील

साप म्हटलं की अनेकांच्या मनात भीतीने काटा उभा राहतो, सापांबद्दल आजही समाजामध्ये अनेक गैर समज आहेत. त्यामुळे आपण अनेकदा सापांना मारतो, परंतु अशा काही ट्रिक आहेत, ज्याच्या मदतीने आपण सापांना न मारता देखील त्यांच्यापासून संरक्षण करू शकतो.

ही वनस्पती म्हणजे सापांचा काळच, घरात लावताच परिसरात लपलेले साप देखील दूर निघून जातील
SNAKE
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 9:57 PM

साप म्हटलं की आजही अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. सापांबद्दल आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो, याच गैरसमजामुळे आपण अनेकदा आपल्या घराशेजारी कुठेही साप दिसला की त्याला मारतो, परंतु तसं न करता त्याची माहिती ही सर्पमित्रांना दिली पाहिजे, ते सुरक्षितपणे सापांना पकडून त्यांच्या आधिवासात मुक्त करतील. तसेच सापांना कधीही पकडण्याचा देखील प्रयत्न करू नये, कारण असं करणं तुमच्या जीवावर देखील बेतू शकतं. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका अधिक असतो, कारण बिळात पाणी शिरल्यामुळे साप बिळाच्या बाहेर पडतात.

असे साप निवाऱ्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेत असतात, सापांना निवाऱ्यासाठी ज्या ठिकाणी आर्द्रता जास्त असते, तसेच लपण्यासाठी पुरेशी जागा असते, जिथे अंधार असतो, अशा जागा अनुकूल असतात. जर अशी जागा तुमच्या घरात असेल तर साप तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे कायम सतर्क असणं गरजेचं असतं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या घराच्या परिसरात किंवा बागेत गवत वाढणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असतं.  घरात अडचण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तसंच घरात जर उंदिर किंवा घुशीने बिळ केलं असेल तर अशा ठिकाणी साप येण्याची  शक्यता जास्त असते. त्यामुळे अशी बिळं बुजवले पाहिजेत.

दरम्यान अशा काही वनस्पती असतात, ज्यामुळे तुमचं सापांपासून संरक्षण होऊ शकतं, या वनस्पतींना असलेल्या विशिष्ट वासामुळे साप त्या परिसरात येत नाहीत, विशेष: काही मसाले पदार्थांच्या वनस्पती अशा असतात, ज्याच्या तीव्र वासामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत, त्यातीलच एक वनस्पती आहे, ती म्हणजे वेखंड, वेखंड हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याची वनस्पती घराच्या आसपास कुठेही असेल तरी साप घरात प्रवेश करत नाही. वेखंड प्रमाणेच तुम्ही ज्या -ज्या ठिकाणावरून साप घरात येण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी कांदा, लसून यांची पेस्ट टाकू शकतात, यामुळे देखील साप घरापासून दूर राहतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us