हे छोटंसं रोपटं म्हणजे सापांचा कदर्नकाळच; साप घराचा रस्ताच विसरून जातो, पुन्हा परिसरातही दिसणार नाही

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरात घुसण्याच्या घटनांमध्ये वाढ होते, त्यामुळे सर्पदंशाच्या प्रमाणात देखील वाढ होते, अशावेळी सापांपासून बाचाव करणं महत्त्वाचं असतं. अशा काही खास ट्रीक आहेत, ज्या तुमचा सापांपासून बचाव करू शकतात.

हे छोटंसं रोपटं म्हणजे सापांचा कदर्नकाळच; साप घराचा रस्ताच विसरून जातो, पुन्हा परिसरातही दिसणार नाही
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 19, 2026 | 9:06 PM

उन्हाळाच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. कारण उन्हामुळे जमीन तापल्याने त्यांना त्याचा त्रास होतो. अशावेळी जेव्हा साप आपल्या बिळातून बाहेर पडतो तेव्हा तो आश्रयासाठी थंड जागेचा शोध घोतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होते, त्याच कारणच हेच आहे की, साप जेव्हा बिळातून बाहेर पडतात तेव्हा ते थंड जागेच्या शोधात तुमच्या घरात देखील घुसतात तुमच्या घरात अशा अनेक जागा असतात जिथे साप सहज लपू शकतो. साप साधारणपणे अशा जागेचा शोध घेतो, जिथे त्याला लपण्यासाठी जागा असेल आणि थंडावा देखील मिळेल. अशावेळी तुमचं जर दुर्लक्ष झालं तर तुम्हाला सर्पदंश होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो, त्यामुळे साप घरात घुसू नये यासाठी या काळात विशेष काळजी घ्यावी लागते.

जे लोक जंगलाच्या जवळ राहतात अशा लोकांच्या घरात वारंवार साप घुसण्याच्या घटना घडत असातात, साप घरात घुसू नये, यासाठी हे लोक एक खास ट्रीक वापरतात. आदीवासी लोक देखील याच खास ट्रीकचा वापर करून सापांपासून आपला बचाव करतात. असे अनेक झाडं आणि रोप आहेत, जे आपल्या विशिष्ट गुणधर्मांमुळे सापांना तुमच्या घरापासून दूर ठेवतात. त्याच्या विशिष्ट वासाचा सापांना त्रास होतो, त्यामुळे साप अशा ठिकाणी येत नाही, आणि तुमचा सापांपासून बचाव होतो. वेखंड हे एक असं झाड आहे, जे जर तुम्ही तुमच्या घराच्या परिसरात किंवा घरात लावलं तर साप तुमच्या घराचा रस्ताच विसरून जातो, पुन्हा तुम्हाला कधीही साप दिसणार नाही. आदिवासी लोक याच ट्रीकचा वापर करून सापांपासून आपला बचाव करतात.

आणखी एक दुसरा उपाय म्हणजे आदिवासी लोक आपल्या घरात महुआची साल देखील ठेवतात, या सालीला विशिष्ट असा वास असतो, त्यामुळे देखील साप कधीच घरात प्रवेश करत नाही. आणि समजा कधी साप घरात तुम्हाला दिसलाच तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला मारू देखील नका, एक चूक तुमच्या जीवावर बेतू शकते, जर तुम्हाला कधी घरात साप दिसला तर सर्वात आधी त्याची माहिती सर्पमित्रांना द्या, ते सापाला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून त्याच्या आधीवासात सोडतील.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us