हे झाड म्हणजे सापांना आमंत्रणच, तुमच्याही घरात आहे का?

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात किंवा तुमच्या परिसरात अनेकदा साप आढळून येतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप नेहमी सुरक्षित निवाऱ्या शोधात इकडे तिकडे भटकत असतात.

हे झाड म्हणजे सापांना आमंत्रणच, तुमच्याही घरात आहे का?
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 8:00 PM

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा तुम्हाला तुमच्या घरात परिसरात साप दिसून येतात. याचं मुख्य कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप हे नेहमी सुरक्षीत जागेच्या शोधात इकडे -तिकडे फिरत असतात. ज्या ठिकाणी आद्रता आहे,  दमट वातावरण आहे, अशा ठिकाणी साप शक्यतो आश्रय घेतात, जर तुमच्या घरात देखील सापांना असं वातावरण मिळालं तर ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात कळजी घेणं गरजेचं असतं. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात. तसेच सापांबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. त्यातील प्रमुख गैरसमज हा आहे की, प्रत्येक साप हा विषारीच असतो. त्यामुळे आपण अनेकदा दिसला साप की त्याला मारतो. मात्र त्यामुळे भारतामधील अनेक दुर्मिळ प्रजातीचे साप नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु प्रत्येक साप हा विषारी नसतो.

भारतामध्ये प्रमुख्याने चारच सापांच्या विषारी जाती आढळून येतात. ज्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या चार प्रजातीच्या सापांचा समावेश होतो. मात्र जरी तुम्हाला कुठे साप दिसला तर त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका, त्याची माहिती तुम्ही सर्पमित्रांना देऊ शकता, सर्पमित्र या सापांना पकडून सुरक्षित अधिवासात सोडतील.

मात्र तुम्हाला हे माहिती आहे का, की काही झाडं आणि वनस्पती अशा असतात की ज्या झाडांकडे साप आपोआप आकर्षित होतात. या झाडांची नैसर्गिक रचनाच अशी असते की, साप या झाडांकडे आकर्षित होतात. विशेष: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका जास्त असतो. पावसाळ्याच्या काळात साप अशा झाडांखाली आश्रय घेऊ शकतात.

त्यातीलच एक झाड आहे, ते म्हणजे केवड्याचं झाड. केवड्याच्या पानांना सुंदर असा सुवास असतो. अनेकदा साप या झाडाच्या आश्रयाला येतात. याच्या पानाखाली साप दडून बसतात. अनेकदा या झाडाभोवती पानथळ जागा तयार होते. पावसाळ्याच्या काळात बेडूक देखील अशा ठिकाणी असतात, त्यामुळे सापांना सहज खाद्य उपलब्ध होतं. त्यामुळे साप आशा ठिकाणाकडे आकर्षित होतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us