उंच उंच हवेल्या, मोठे दरवाजे, इमारतीखालून जाणारे रस्ते, भारतातील असं एक गावं जिथे 60 दिवसांमध्ये जमा झाले 1200 कोटी रुपये

भारतामध्ये अशी देखील काही गावं आहेत, जी प्रचंड श्रीमंत आहेत. असंच एक गाव आता चर्चेत आलं आहे. या गावाला हवेलीचं गाव म्हणून देखील ओळखलं जातं. ज्या गावात 60 दिवसांमध्ये तब्बल 1200 कोटी रुपये जमा झाले आहेत.

उंच उंच हवेल्या, मोठे दरवाजे, इमारतीखालून जाणारे रस्ते, भारतातील असं एक गावं जिथे 60 दिवसांमध्ये जमा झाले 1200 कोटी रुपये
village
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 16, 2026 | 5:19 PM

ही गोष्ट त्या गावाची आहे, ज्या गावात प्रत्येक कुटुंबाकडे सुंदर हवेली वाटावी अशी घरं आहेत. या गावातील प्रत्येक घराला उंच उंच दरवाजे लावण्यात आले आहेत. गावाच्या प्रवेशद्वाराला तर एवढा मोठा दरवाजा लावण्यात आला आहे, ज्याच्या खालून रस्ता जातो. या गावाला आदर्श गावाचा पुरस्कार देखील भेटला आहे. हे गाव राजस्थानच्या झुणझुणू जिल्ह्यात आहे. आता असं कोणतं गाव आहे? याबाबत तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झालीच असेल तर या गावाचं नाव आहे, मंडावा. हे गाव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असून, या गावाला हवेलींचं गाव म्हणून देखील ओळखलं जातं. हे गाव पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु आहे. या गावाच्या प्रत्येक इमारतीला भव्य असे दरवाजे असून, प्रत्येक दरवाजावर सुंदर असं नक्षीकाम केलं आहे. या गावाला राजस्थानची फिल्मसिटी असं देखील म्हटलं जातं. या गावात बॉलिवूडच्या दोन ब्लॉकबास्टर चित्रपटाचं चित्रिकरण देखील झालं आहे.

हे गाव प्रचंड श्रीमंत आहे, या गावाने आतापर्यंत देशाला अनेक मोठे बिझनेसमॅन दिले आहेत. हे गाव फतेहपूर (शेखावटी) रेल्वे स्टेशनपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. या गावात तब्बल 350 हवेल्या आहेत. यातील अनेक इमारतींमध्ये आता लोकांनी हॉटेल आणि होस्टेल सारखे व्यवसाय सुरू केले आहेत. या गावाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात, त्यामुळे येथील लोकांचा व्यवसाय देखील चांगला चालतो.

या गावात आतापर्यंत अनेक चित्रपटांचं चित्रिकरण झालं आहे. 2014 आणि 2015 ही दोन वर्ष बॉलिवूडसाठी हीट राहिली आहेत. 19 डिसेंबर 2014 ला पिके चित्रपट रिलिज झाला, या चित्रपटाचे अनेक सिन्स याच गावात शूट करण्यात आले होते. या चित्रपटाचं एकूण बजेट 122 कोटी रुपये इतकं होतं तर या चित्रपटाने तब्बल 616 कोटी रुपयांची कमाई केली, या चित्रपटात अमीर खान मुख्य भूमिकेत होता.

तर 17 जुलै 2015 ला बजरंगी भाईजान चित्रपट रिलिज झाला, या चित्रपटामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचं चित्रिकरण देखील या गावात झालं होतं. या चित्रपटाचं एकूण बजेट 125 कोटी इतकं होतं, हा चित्रपट बॉकबास्टर ठरला, या चित्रपटाने 600 कोटी रुपयांची कमाई केली. या दोन्ही चित्रपटांनी मिळून एकून 1216 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या दोन्ही चित्रपटांच्या टीम या गावात प्रत्येकी तीस -तीस दिवस म्हणजे एकूण 60 दिवस मुक्कामाला होत्या.

Follow Us