साप माणसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना

पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशी एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका मानसाला साप चावल्यानंतर त्याच्या उपचारासाठी तब्बल 11 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

साप माणसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 17, 2026 | 9:17 PM

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. ते नेहमीच आश्रयासाठी सुरक्षित जागेच्या शोधात असतात. पावसाळ्यामध्ये साप सामान्यपणे कोरड्या आणि अंधाऱ्या जागेचा शोध घेतात. अशावेळी जर सापांना तुमच्या घरात अशी जागा सापडली तर ते घरात देखील प्रवेश करू शकतात. जर तुमचं थोडं देखील त्याकडे दुर्लक्ष झालं तर तुम्हाला सर्पदंश होऊ शकतो, अशीच एक घटना आता समोर आली आहे. एक व्यक्ती आपल्या घरासमोरील बागेमध्ये फिरत होता. तिथे त्याला अचानक आपल्या पायाला काट्या सारखं काहीतरी टोचल्याचं जणवलं, त्याने जेव्हा खाली पाहिलं तेव्हा तिथे एक साप होता. सापाने त्याला चावा घेतला होता. हा साप काही साधा नव्हता तर सापांच्या अत्यंत विषारी प्रजातीमध्ये समावेश होणारा रॅटल स्नेक होता.

या सापाने या व्यक्तीच्या पायाला अशा जागी चावा घेतला की ज्यामुळे नसेच्या माध्यमात विष लगेचच त्याच्या संपूर्ण रक्तात पसरलं. काही वेळातच त्याचं संपूर्ण शरीर सुजलं, तो तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला, त्याची ही अवस्था पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला, या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी त्याला तब्बल 54 इजेक्शन देण्यात आले. 54 इजेक्शन दिल्यानंतर या व्यक्तीच्या रक्तातील विषाचा प्रभाव कमी झाला. जेव्हा हा व्यक्ती रुग्णालयातून डिसचार्ज झाला, तेव्हा त्याच्या हातात बिल देण्यात आलं, या बिलावरील आकडा पाहून संबंधित व्यक्तीला आणि त्याच्या कुंटुबाला प्रचंड धक्का बसला कारण ही रक्कम थोडी थिडकी नव्हती तर तब्बल 11 कोटी रुपयांचं बिल रुग्णालयाने या व्यक्तीला दिलं होतं.

ही घटना अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे. क्रिस होवर्थ असं या व्यक्तीचं नाव आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बागेमध्ये फिरत असताना क्रिस होवर्थला एका अत्यंत विषारी अशा सापाने चावा घेतला होता, या सापाने बरोबर पायाच्या शिरेलाच दंश केल्यामुळे थोड्याच वेळात हे विष त्यांच्या संपूर्ण शरीरात पसरलं. तो प्रचंड सुजला, त्याला बोलता देखील येत नव्हतं, तो तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला, परंतु या सापाच्या चाव्यामुळे त्याला ‘डिसॅमिनेटेड इंट्रावास्कुलर कोगुलेशन’ नावाचा एक अतिशय दुर्मिळ असा आजार झाला होता, या आजारावर उपचार करण्यासाठी या व्यक्तीला तब्बल 11 कोटी रुपयांचा खर्च आला.

 

Follow Us