Jammu High Alert : जम्मूत हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींच्या सभा ठिकाणाच्या आवारात दोन संशयित दिसले!

| Updated on: Apr 23, 2022 | 11:56 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या जम्मूतील सांबा येथील पल्ली गावात सभा होणार आहे. आज याच गावातील डेटा तालाब परिसरात दोन संशयित लोक लष्कराच्या गणवेशात फिरत असल्याचे दिसले. हे दोघे संशयित दिसल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

Jammu High Alert : जम्मूत हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींच्या सभा ठिकाणाच्या आवारात दोन संशयित दिसले!
पंतप्रधान मोदींच्या सभा ठिकाणाच्या आवारात दोन संशयित दिसले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जम्मू : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जम्मूमध्ये हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. येत्या रविवारी पंतप्रधान जम्मूमध्ये येणार आहेत. याचदरम्यान आज शनिवारी जम्मूतील सांबा येथील पल्ली गावाजवळ दोन संशयित लोक दिसले. ते दोघे पंतप्रधान मोदींची सभा ज्याठिकाणी होणार आहे, त्याच परिसरात संशयास्पद फिरताना आढळून आले. मात्र ते सुरक्षा दलांच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुरक्षा दलांनी सर्वत्र शोध मोहीम सुरू केली असून पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथे जागता पहारा ठेवण्यात येणार आहे. (Two suspects were spotted in the premises of Prime Minister Modi meeting place)

लष्कराच्या गणवेशात संशयितांचा वावर

एनडीटीव्ही इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या जम्मूतील सांबा येथील पल्ली गावात सभा होणार आहे. आज याच गावातील डेटा तालाब परिसरात दोन संशयित लोक लष्कराच्या गणवेशात फिरत असल्याचे दिसले. हे दोघे संशयित दिसल्याने स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराला वेढा घातला. सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र या मोहिमेत अजूनपर्यंत कोणतीही संशयित व्यक्ती किंवा वस्तू दिसलेली नाही. त्यामुळे ते दोघे संशयित नेमके गेले कुठे? हा प्रश्न उपस्थित झाला असून सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

दोन दिवसांपूर्वीच सीआयएसएफ जवानांच्या बसवर झाला होता हल्ला

पंतप्रधान मोदींची उद्या ज्या ठिकाणी सभा होणार आहे, तेथे सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय करण्यात आली आहे. शुक्रवारीच जम्मूमध्ये सीआयएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते, तर एक जवान शहीद झाला. तसेच आठहून अधिक जवान जखमी झाले. त्याआधीही चकमक उडाली होती. काही तासांच्या फरकाने झालेल्या दोन चकमकींत एकूण सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले होते.

दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावणार : जम्मू-काश्मीर पोलीस

हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीर पोलीस दलाचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना पंतप्रधानांच्या सभेत अडथळा आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्व सुरक्षा दले हाय अलर्टवर आहेत. दहशतवाद्यांचे कोणतेही नापाक मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार सिंह यांनी व्यक्त केला आहे. जम्मूबाहेरील सुंजवान लष्करी छावणीजवळ झालेल्या चकमकीनंतर जम्मू-कश्मीरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Two suspects were spotted in the premises of Prime Minister Modi meeting place)

इतर बातम्या

UP Murder : पतीला जबरदस्तीने सुसाईड नोट लिहायला भाग पाडले आणि हत्या केली!; झाशीत सेल्स मॅनेजरच्या हत्येने खळबळ

Rajgad Honey bee Attack : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली