UP Murder : पतीला जबरदस्तीने सुसाईड नोट लिहायला भाग पाडले आणि हत्या केली!; झाशीत सेल्स मॅनेजरच्या हत्येने खळबळ

सेल्स मॅनेजर दीपक जैनच्या खिशात सापडलेल्या चिट्ठीत त्याने नातेवाईक आणि सावकारांकडून होत असलेल्या छळाचा उल्लेख केला आहे. त्यावर दिपकच्या पत्नीने पोलिसांत जबाब नोंदवला आहे. त्यात तिने पतीच्या मारेकऱ्यांनी बळजबरीने सुसाईड नोट लिहून घेतली असावी आणि नंतर पतीची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली आहे.

UP Murder : पतीला जबरदस्तीने सुसाईड नोट लिहायला भाग पाडले आणि हत्या केली!; झाशीत सेल्स मॅनेजरच्या हत्येने खळबळ
संपत्तीच्या वादातून काकांनीच पुतण्याला 11 वेळा भोसकलेImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 11:46 PM

झाशी : उत्तर प्रदेशच्या झाशी शहरात सेल्स मॅनेजर (Sales Manager)च्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. एका रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळला. त्याच्या खिशात सुसाईड नोट (Suicide Note)ही सापडली. मात्र ही सुसाईड नोट मारेकऱ्यांनीच जबरदस्तीने लिहून घेतली असावी आणि नंतर पतीची हत्या केली असावी, असा आरोप सेल्स मॅनेजरच्या पत्नीने केला आहे. दिपक जैन असे हत्या करण्यात आलेल्या सेल्स मॅनेजरचे नाव आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. या अनुषंगाने अधिक तपास करण्याबरोबरच पत्नीच्या आरोपामागे दुसरा कोणता हेतू आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. नातेवाइकांवरही छळवणुकीचा आरोप केला गेल्याने दिपकच्या पत्नीने सुसाईड नोटवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (first forced to written suicide note then murdered of sale manager in uttar pradesh)

नातेवाईक आणि सावकारांकडून छळ झाल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख

सेल्स मॅनेजर दीपक जैनच्या खिशात सापडलेल्या चिट्ठीत त्याने नातेवाईक आणि सावकारांकडून होत असलेल्या छळाचा उल्लेख केला आहे. त्यावर दिपकच्या पत्नीने पोलिसांत जबाब नोंदवला आहे. त्यात तिने पतीच्या मारेकऱ्यांनी बळजबरीने सुसाईड नोट लिहून घेतली असावी आणि नंतर पतीची हत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली आहे. झाशीतील मुस्तारा रोड येथील एका रस्त्याच्या कडेला सेल्स मॅनेजरचा मृतदेह आढळला. दोन दिवसांनी हा मृतदेह दिसून आला आहे. सुसाईड नोटमध्ये व्याजाने पैसे देणाऱ्या तीन सावकारांबरोबरच 6 जणांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. या लोकांनी छळ केल्याचा आरोप दीपक जैनने सुसाईड नोटमधून केला आहे. पतीला बळजबरीने सुसाईड नोट लिहायला लावली गेली आणि त्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेजच्या शवागारात ठेवला आहे.

हत्या झालेल्या सेल्स मॅनेजर पत्नी-मुलांपासून वेगळा राहायचा

शिवपुरीच्या कथा कॉलनीत राहणारा दीपक जैन (50) हा पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत होते. तो सुमारे 14 वर्षांपासून झाशीच्या मिशन कंपाऊंडमध्ये भाड्याने राहत होते. 7 महिन्यांपासून दीपक एका फूड कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. घरगुती वादामुळे तो अनेक महिन्यांपासून पत्नी आणि मुलांपासून वेगळा राहत होता. त्याला त्याच्या मुलांशी आणि भावांशी फोनवर बोलायचे होते. कारखाना मालकाने 4.75 लाख रुपयांची मागणी केली होती. याचदरम्यान दीपक जैनचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. (first forced to written suicide note then murdered of sale manager in uttar pradesh)

इतर बातम्या

Rajgad Honey bee Attack : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या चौघा जणांवर मधमाशांचा हल्ला, हल्ल्यानंतर पळापळीत महिला दरीत कोसळली

Ulhasnagar Fraud : चंद्रावर जमीन घेणाऱ्यानं 770 स्क्वेअर फूट जागा लाटली? उल्हासनगरच्या राम वाधवाविरोधात फसवणुकीचा गुन्हा

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.