VIDEO : उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

पांढऱ्या रंगाची कार घेऊन एक व्यक्ती भरधाव वेगात गजानन मार्केट परिसरात शिरला आणि त्याने हेलकावे खात रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गाड्यांवर आपली कार चढवली. याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दाम्पत्यालाही त्याने उडवलं. यानंतर मार्केटमधील नागरिकांनी कार चालकाला पकडले आणि उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

VIDEO : उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक, घटना सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगरात भरधाव कारचालकाची अनेक गाड्यांना धडक
Image Credit source: TV9
निनाद करमरकर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Apr 23, 2022 | 8:23 PM

उल्हासनगर : एका भरधाव कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना धडक (Hit) देत एका दाम्पत्याला उडवल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. उल्हासनगरच्या अतिशय गजबजलेल्या गजानन मार्केट परिसरात शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि गाडी अनियंत्रित होऊन वेगात येत इतर गाड्यांना धडकली. ही संपूर्ण घटना गजानन मार्केट परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी कार चालकाला पकडून उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. सुदैवाने या घटनेच कुणालाही गंभीर इजा झाली नाही. (In Ulhasnagar speedy car hit several vehicles, incident captured on CCTV)

भरधाव वेगातील कारची अनेक गाड्यांना धडक

पांढऱ्या रंगाची कार घेऊन एक व्यक्ती भरधाव वेगात गजानन मार्केट परिसरात शिरला आणि त्याने हेलकावे खात रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गाड्यांवर आपली कार चढवली. याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दाम्पत्यालाही त्याने उडवलं. यानंतर मार्केटमधील नागरिकांनी कार चालकाला पकडले आणि उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उल्हासनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता का? हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करावी लागणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितलं. या घटनेत सुदैवानं कुणालाही गंभीर इजा झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. (In Ulhasnagar speedy car hit several vehicles, incident captured on CCTV)

इतर बातम्या

Breaking News : अखेर राणा दाम्पत्याला मुंबईत अटक, आजची रात्र पोलिस ठाण्यात जाणार? चिथावणीखोर वक्तव्याचा आरोप

Crime : एक बातमी, जी देताना आमचं काळीज जड झालंय, फोटो पहा म्हणण्याची आमची हिंमत नाही, तुम्ही सावध असा !

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें