AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gas Shortage : चुलीवरचा चहा, चुलीवरची भजी, चुलीवरच्या जिलेब्या… हॉटेलात पेटल्या धडाधडा चुली… गॅसच्या टंचाईवर देशी जुगाड; ग्राहकांची चंगळ…

आखाती युद्धामुळे देशात व्यावसायिक गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे हॉटेल व्यवसाय गंभीर संकटात आहे. गॅस वितरण थांबल्याने आणि दरांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने अनेक ठिकाणी हॉटेल चालकांनी चुली व लाकडी भट्ट्यांचा आधार घेतला आहे. नागपूर, नाशिकसह अनेक शहरांत ही परिस्थिती असून, लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे, ज्यामुळे नागरिकांनाही महागाईचा सामना करावा लागत आहे.

Gas Shortage : चुलीवरचा चहा, चुलीवरची भजी, चुलीवरच्या जिलेब्या... हॉटेलात पेटल्या धडाधडा चुली... गॅसच्या टंचाईवर देशी जुगाड; ग्राहकांची चंगळ...
Gas ShortageImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 11, 2026 | 11:05 AM
Share

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात चिंतेचं वातावरण असतानाच या युद्धाचा फटका भारतालाही बसताना दिसत आहे. युद्धामुळे अनेक देशांत विमान उड्डाण रद्द झाल्याने नागरिक अडकले, तसेच निर्यात ठप्प झाल्याने भारतातील अनेक व्यावसायिक, शेतकरी यांचा माल अडकून पडल्याने त्यांना मोठं नुकसान होताना दिसत आहे. हे कमी की काय म्हणून आता देशात गॅसचाही मोठा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती झटक्यात वाढवल्याने नागरिकांना मोठा फटका तर बसलाच पण हॉटेलिंग, बाहेर खाण्या पिण्याचेही दर वाढत असल्याने त्याचा खिशावर भार पडू शकतो.

त्यातच आता व्यायवसायिक सिलेंडरचं वितरहणी बंद झाल्याने हॉटेल मालक, चालक यांची अडचण वाढली आहे. अनेक ठिकाणी तर गॅस नसल्यामुळे हॉटेल चालकांना चुलीचा आधार घेत त्यावर स्वयंपाक करावा लागत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास, पुढे हॉटेल चालवणं कठीण होऊ शकतं, असं मतही अनेकांनी व्यक्त केलंय

नागपूरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचं वितरण बंद, हॅाटेलवाल्यांनी पेटवल्या चुली

नागपूरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचं वितरण बंद, हॅाटेलवाल्यांनी चुली पेटवल्या आहेत. हॉटेलमध्ये आता सिलिंडरच नसल्याने चुलींवर अन्न शिजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागपूरातील प्रसिद्ध संतोष पकोडेवाल्याने आपल्या हॅाटेलमध्ये चुल पेटवली आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवडा असल्याने कंपन्यांकडून गॅस एजन्सीला व्यावसायिक सिलिंडर वितरण न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने हॅाटेल बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांनी हार न मानता त्यातूनही शक्कल लढवली आहे. गॅस नसल्यावर हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा चूल पेटवण्याचा पर्याय अनेकांनी स्वीकारला आहे. नागपूरातील अनेक हॅाटेलमध्ये अन्न शिजवण्यासाठी पहिल्यांदाच चूल पेटली आहे.

अशीच परिस्थिती नाशिकमध्येही असून घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवत आहे. तेथेही हॉटेल चालकांनी पर्याय शोधला असून अनेक हॉटेलमध्ये आता चुलीवर स्वयंपाक शिजवला जात आहे.

जालन्यात हॉटेल चालकांसह इतर छोटे मोठे व्यावसायिक संकटात

आखाती देशांमधील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे जगभरात अनेक ठिकाणी त्याचे परिणाम पाहायला मिळत आहे.प्रामुख्याने गॅस पुरवठ्यावर त्याचा परिणाम अधिकच झाल्याने अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाला आहे. जालन्यात व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्याने हॉटेल चालक,छोट्या-मोठ्या खानावळी यांच्यावर देखील त्याचा परिणाम झाला आहे. पुढील एक ते दोन दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक असल्याने त्यानंतर मात्र आपला व्यवसाय चालवायचा कसा असा मोठा प्रश्न हॉटेल सह इतर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना पडला असून त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील खानावळ – डोसा सेंटर वळले लाकडी भट्टीकडे.

हॉटेल व्यावसायिकाला गॅस मिळत नसल्याने अनेकांनी चुलभट्ट्या पेटवल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील अनेक खानावळ – डोसा सेंटर लाकडी भट्टीकडे वळले आहेत. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक खानावळी आणि दोसा सेंटर चालकांनी पुन्हा लाकडी चुलभट्ट्यांचा आधार घेतला आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत या चुलभट्ट्यांमुळे मोठी उष्णता आणि धूर निर्माण होत असल्याने कारागिरांना काम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून व्यावसायिक गॅसचा पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.

ठाण्यातही गॅस शॉर्टेज, वडापावलाही फटका

युद्धाचा परिणाम भारतातील मोठ्या हॉटेल व्यवसायिकांवर झालेला पाहायला मिळत असतांनाच सर्व सामान्यांचा खाद्य पदार्थ असणाऱ्या वडापाववरी परिणाम झाल्याचे दिसत आहे. युद्धामुळे व्यावसायिक सिलेंडर आणि तेलाचे भाव वाढल्याने वडापाव विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. ठाण्यातील प्रसिद्ध अशा राजमाता वडापाव विक्रेत्याला दररोज 2 ते 3 सिलेंडर लागतात. मात्र आता गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि भाव वाढ झाल्याने वडापाव विक्रेत्याला आता गॅस सिलेंडरसाठी सकाळपासून फिराव लागत आहे, त्यामुळे आता वडापाव विक्रेत्यांची चिंता वाढलीये.

कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्रालाही फटका

गॅस तुटवड्याचा कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्रालाही फटका बसला आहे. अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अन्नछत्रामधील जेवण तयार करण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटलं आहे. महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये रोज 4 ते 5 हजार भाविक मोफत जेवणाचा आस्वाद घेत होते . मात्र आका गॅस पुरवठा होत नसल्याने गेल्या चार दिवसांपासून दोन ते अडीच हजार लोकांचचं जेवण बनवलं जात आहे.

गॅस पुरवून वापरा अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्या महालक्ष्मी अन्नछत्राला दिल्या आहेत. महालक्ष्मी अन्नछत्राकडे पुढचे चार ते पाच दिवस पुरेल इतकाच गॅस साठा आहे. गॅस तुटवडा लक्षात घेता महालक्ष्मी अन्नछत्र कडून चुलीवर जेवण तयार करण्याची तयारी चालू असून लाकूड मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Follow Us
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी
आंदोलन संपलं मात्र अभिजीत दीपकेची तब्येत खालावली; रुग्णालयातील फोटोंनी वाढवलं टेन्शन
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...