AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाड.. धाड.. कोसळले तेलाचे भाव, अखेर आनंदाची बातमी आलीच, एक घोषणा आणि..

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढला होता. त्यामध्येच आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दिलासा देणारी घोषणा केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिका इराणवरील हल्ले थांबवत आहे. त्यानंतर आता थेट जागतिक बाजारावर याचा परिणाम झाल्याचे दिसतंय.

धाड.. धाड.. कोसळले तेलाचे भाव, अखेर आनंदाची बातमी आलीच, एक घोषणा आणि..
Crude oil prices
| Updated on: Jul 27, 2026 | 7:50 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगाला वैताग आला. या युद्धाचे परिणाम फक्त इराण आणि अमेरिका पुरतेच मर्यादित नव्हते तर याचे गंभीर परिणाम भारतासह अन्य देशांवरही होत होती. भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढताना दिसले. जागतिक बाजारही अस्थिर झाला. अमेरिका इराणवर मोठे हल्ले करत होती. सलग इराणवर हल्ले सुरू होती. होर्मुज खाडी पार करणाऱ्या जहाजांना टार्गेट करून हल्ले केले जात होते. अखेर काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठी घोषणा केली. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध सध्या थांबवले आहे. अमेरिकेने इराणसोबतचे युद्ध थांबवण्याची घोषणा करताच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली. सतत वाढणारे कच्च्या तेलाचे भाव घसरले आहेत. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सुमारे 6 टक्क्यांची घट दिसून आली. हा मोठा दिलासा जगाला म्हणावा लागेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव सतत वाढत होते. आता कुठे दिलासा मिळाला. आखाती देशांमधील कच्च्या तेलाचा व्यवहार 91 डॉलर्सच्या आसपास होत आहे. अमेरिकन कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 44 डॉलर्स इतका आहे. इराणवर अमेरिका मोठे बॉम्ब हल्ले करत होती. होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनवले होते. होर्मुज खाडीच्या आसपास अमेरिका हल्ले करत होती.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्करतळावर इराणने मोठे हल्ले केले. अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष वाढताना दिसला. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा युद्ध पेटले. ज्यानंतर जागतिक बाजारात खळबळ उडाली. अमेरिकेने युद्ध थांबवण्याच्या केलेल्या घोषणेनंतर पुन्हा एकदा जगाने सुटकेचा निश्वास घेतला.

आता इराणसोबतचे युद्ध थांबवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा टॅरिफ लादण्याच्या मूडमध्ये आहेत. नुकताच त्यांनी काही दिवसांवर टॅरिफ लावला. आता पुन्हा ते आपले टॅरिफचे शस्त्र काढत आहेत. भारतावरही पुन्हा टॅरिफ अमेरिकेने लावला. 10 टक्के नवा टॅरिफ भारतावर लावण्यात आला. आता अजून काय मोठी निर्णय डोनाल्ड ट्रम्प घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना