AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sayaji Shinde: सयाजी शिंदेंच्या मुलाला पाहिलंत का? बापलेकाची जोडी एकत्र झळकणार चित्रपटात

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मुलाला तुम्ही पाहिलंत का? आता बापलेकाची ही जोडी पडद्यावर एकत्र झळकणार आहे. सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Sayaji Shinde: सयाजी शिंदेंच्या मुलाला पाहिलंत का? बापलेकाची जोडी एकत्र झळकणार चित्रपटात
सयाजी शिंदे आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2026 | 10:18 AM
Share

सध्या रुपेरी पडद्यावर कलाकारांची पुढची पिढी मुख्य भूमिकांमध्ये बघायला मिळतेय. राजकारणात किंवा मनोरंजन क्षेत्रात बाप-बेटे एकत्र असणे आता नवं नाही. चित्रपटसृष्टीत बाप-बेटे एकत्रित झळकण्याची परंपरा आहेच. या यादीत एका विशेष जोडीचा समावेश होणार आहे. मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांचा मुलगा सिद्धार्थ सयाजी शिंदे आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘विष्णूबाळा’ या आगामी मराठी चित्रपटातून ही बापलेकाची जोडी मराठी रुपेरी पडद्यावर एकत्र काम करणार आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिद्धार्थ सयाजी शिंदे अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे.

सयाजी शिंदेंसोबत शेअर करणार स्क्रीन

‘विष्णूबाळा’ या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत सिद्धार्थ दिसणार आहे. ‘महाविद्यालयीन काळापासून मला या क्षेत्राची ओढ वाटू लागली. या क्षेत्रात काम करण्यासाठी मी अभिनयाचे रितसर प्रशिक्षण ही घेतलं. सुरुवात करायची तर मराठी चित्रपटातून हे मी ठरवलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या पदार्पणाचा आणि वडिलांसोबत काम करण्याचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करायला मिळतंय,’ हे आमच्यासाठी आनंददायी असल्याचं हे दोघं सांगतात. या बाप लेकाच्या जोडीला एकत्र पाहणे निश्चितच पर्वणी असणार आहे.

‘विष्णूबाळा’ चित्रपटाची निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि सिनेम्यटिक सफारी फिल्म प्रोडक्शन या बॅनरखाली होत असून, लेखन अरविंद जगताप यांनी केले आहे. दिग्दर्शनाची धुरा ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटातून यश मिळवलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे सांभाळत आहेत. निर्मिती शिव समर्थ फिल्म प्रोडक्शन यांची असून सहनिर्माते सचिन क्षीरसागर आहेत. कार्यकारी निर्माते आदित्य गायकवाड आहेत.

सत्यघटनेवर आधारलेल्या, रक्तरंजित संघर्षाचा नायक असलेल्या विष्णूबाळाची मध्यवर्ती भूमिका सयाजी शिंदे साकारणार असून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांची मांदियाळी या भव्य चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मराठीसोबत हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. सयाजी शिंदे आणि त्यांच्या मुलाला पडद्यावर एकत्र पाहणं ही चाहत्यांसाठीही पर्वणीच असणार आहे.

Follow Us
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?