AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षक -पदवीधरची मतमोजणी होते कशी? ठरतो कसा कोटा? पसंतीक्रमाचे सीक्रेट माहिती आहे का?

Maharashtra Teacher and Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीपेक्षा मतमोजणीची खरी चर्चा होते. कारण यामध्ये तांत्रिक आणि किचकट प्रक्रिया असते. लोकसभा, विधानसभेसारखी ही प्रक्रिया नसते. एक कोटा ठरवल्यानंतर विजयाचा मार्ग निश्चित होतो.

शिक्षक -पदवीधरची मतमोजणी होते कशी? ठरतो कसा कोटा? पसंतीक्रमाचे सीक्रेट माहिती आहे का?
शिक्षक -पदवीधरची मतमोजणी होते कशी? ठरतो कसा कोटा? पसंतीक्रमाचे सीक्रेट माहिती आहे का?
| Updated on: Oct 28, 2026 | 9:56 AM
Share

Teacher and Graduate Constituency Election Counting: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी अजून कशी झाली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींना वाटलं अगदी झटपट निकाल बाहेर येईल. पण इतर निवडणुकांपेक्षा ही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक वेगळी असते. यातील मतदारही शिक्षक आणि पदवीधरच असतात. एकल आणि पसंतीक्रमानुसार मतमोजणी प्रक्रिया राबवली जाते. त्याचे नियमही ठरलेले असतात. ही पद्धत किचकट आणि वेळखाऊ असते. तसेच तांत्रिक बाबीही महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे निकाल येण्यास थोडा उशीर लागतो.

कसा ठरवतात पसंतीक्रम?

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होत नाही. तर बॅलेट पेपरचा, मतपत्रिकेवर मतदान घेण्यात येते. या मतपत्रिकेवर सर्व उमेदवारांची नावे नोंदवलेली असता. या उमेदवारांपुढे मतदारांना त्यांचा पसंतीक्रम म्हणजे, 1, 2, 3, 4 असा इंग्रजी अथवा देवनागरी अंकातील पसंतीक्रम द्यावा लागतो. यामध्ये मतदारांना 1 नंबरचा पसंती क्रम नोंदवणे अनिवार्य असते. इतर उमेदवारांना कोणता क्रमांक द्यायचा, कोणता पसंतीक्रम द्यायचा हा अधिकार मतदारांना असतो. अधिकाधिक पसंतीक्रम नोंदवल्यास उमेदवारांना मोठा फायदा होतो.

विजयासाठी कोटा कसा होतो निश्चित?

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अर्थातच पहिल्या पसंती क्रमांची म्हणजेच, मतपत्रिकेवर 1 क्रमांक असलेली मते मोजली जातात. ही मतं मोजणी झाल्यावर विजयाचा कोटा ठरवला जातो. हा कोटा ठरवताना एका सूत्राचा वापर करण्यात येतो.

कोटा =           एकूण वैध मते ———–                                    +1 विजेत्यांची संख्या+1

पहिल्या फेरीत सर्व वैध मतांमध्ये पहिला पसंतीक्रम कोणाला मिळाला याचा हिशोब मांडल्या जातो. त्याची वर्गवारी केली जाते. जो उमेदवार मोजणीच्या पहिल्या फेरीतच सूत्रानुसार विजयाचा कोटा प्राप्त करतो. त्याला विजयी घोषीत करण्यात येते.

कोटा पूर्ण न झाल्यास काय करतात?

जर पहिल्या फेरीत एकही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण केला नाही तर मग मतमोजणीची प्रक्रिया अधिक किचकट आणि गुंतागुंतीचे होते. ही प्रक्रिया लांबते. पुढील टप्प्यात सर्वात कमी मतं मिळवणारा उमेदवार प्रक्रियेतून बाद होतो. सर्वात कमी पसंतीची मतं मिळवणारा उमेदवार एलिमिनेट, म्हणजे मतमोजणीतूनच बाद होतो.

आता या बाद झालेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवरील क्रमांक दोनची मतं, म्हणजे दुसऱ्या पसंतीची मतही रिंगणातील उमेदवारांच्या खात्यात पसंतीक्रमानुसार जमा करण्यात येतात. ही प्रक्रिया तोपर्यंत सुरूच ठेवण्यात येते, जोपर्यंत उरलेल्या उमेदवारांपैकी कोणीतरी निर्धारीत कोटा गाठून विजयाचा आकडा ओलांडत नाही. यामुळे याप्रक्रियेत केवळ पहिल्या पसंतीचीच नाही तर विजयासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतंही निर्णायक ठरू शकतात. यामुळे निकालाचे पारडेच फिरते.

Follow Us
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?