Sara Ali Khan: ‘माझ्याकडे असा बाप नाही जो…’, सारा अली खान असं काय बोलून गेली, चर्चांना उधाण
Sara Ali Khan: 'सिंगल मदरसोबत राहिली आहे, माझ्याकडे असा बाप नाही जो...', अभिनेत्री सारा अली खान हिच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, तर जाणून घ्या सारा असं का म्हणाली.

Sara Ali Khan: अभिनेत्री सारा अली खान हिने ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि एका रात्रीत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ‘केदारनाथ’ सिनेमानंतर सारा हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. पण बाप अभिनेता सैफ अली खान असल्यामुळे सारा हिला सिनेमांमध्ये काम मिळत आहे… असं अनेक जण म्हणाले. यावर आता सारा हिने स्पष्ट उत्तर दिलं आहे. सांगायचं झालं तर, सारा अली खान ही अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांची लेक आहे. पण अमृता आणि सैफ यांच्या घटस्फोटानंतर, आईने सारा आणि भाऊ इब्राहिम यांचा सिंगल मदत म्हणून सांभाळ केला. तर जाणून घ्या, सारा ‘मी सिंगल मदरसोबत राहिली आहे, माझ्याकडे असा बाप नाही जो…’, असं का म्हणाली.
बॉलिवूडमध्ये मिळत असलेल्या संधीबद्दल सारा अली खान म्हणाली, ‘मी एका सिंगल मदरकडे राहिली आहे. माझ्याकडे असा कोणता बाप नाही जो, माझ्यासाठी लोकांच्या ऑफिसमध्ये जाईल आणि कॉन्ट्रॅक्ट बघेल… तुमच्या सिनेमांमध्ये माझ्या मुलीला घ्या… अशी दुसऱ्याकडे विनंती करेल. जेव्हा ‘केदारनाथ’ सिनेमाच्या वेळी मला अडचणी आल्या, तेव्हा माझं मला सावरावं लागलं. कारण माझ्याकडे कोणी गॉडफादर नाही…’ असं देखील सारा म्हणाली.
एवढंच नाही तर, सारा असं देखील म्हणाली की, ‘जान्हवी कपूर किंवा अनन्या पांडे यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबाची निवड केली नाही. त्यांच्या जन्म फक्त नशिबाने झाला… या सर्व नशिबाच्या गोष्टी आहेत. याचा स्वीकार त्यांनी देखील केला आहे की, बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी त्यांना कुटुंबाचा फायदा झाला. पण त्यामागे त्यांची मेहनत देखील आहे.’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सारा अली खान हिची चर्चा रंगली आहे.
सारा अली खान हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री नुकताच ‘उडता तीर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमा 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
आता सारा ‘गोलमाल 5’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येऊ शकते. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रोहित शेट्टी याची आहे. तर सिनेमात अजय देवगण, अक्षय कुमार, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आणि कुणार खेमू मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
