AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur MLC Election Result 2026: पोट्टे हो अबे आपणच किंगमेकर… नितेश कराळे कुणाचा गेम वाजवणार; नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट

Nagpur MLC Election Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nagpur MLC Election Result 2026: पोट्टे हो अबे आपणच किंगमेकर... नितेश कराळे कुणाचा गेम वाजवणार; नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा ट्विस्ट
Nitesh KaraleImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 28, 2026 | 9:49 AM
Share

सध्या संपूर्ण राज्याचे नागरपूरमधील पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमग्राउंड असलेल्या या मतदार संघाचा निकाल काय लागतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण येथील भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या प्रचारासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे मैदानात उतरले होते. पण चर्चा मात्र, अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांची सुरु आहे.

मतदानाच्या काही तास आधी शरद पवार गटाने नितेश कराळे यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. या निर्णयामुळे ते प्रचंड दुखावले गेले होते आणि त्यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. या इमोशनल अपीलचा मतदानाच्या दिवशी त्यांना फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. तसेच प्रचारादरम्यान त्यांनी मला आणि अभिजीत वंजारीला मतदान करा असा असे म्हटले होते.

वाचा: कराळे मास्तरांच्या रडण्याने भाजप अडचणीत? गेम फिरला, नेमकं काय घडलं?

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजीत वंजारी यांना जास्त मतं मिळतात की सुधाकर कोहळेंना यावरच नागपूर मतदार संघाचा निकाल अवलंबित राहण्याची शक्यता आहे. नितेश कराळे यांनी 24,249 मते घेतली असून त्यामध्ये कोहळे आणि वंजारी यांमध्ये कुणाच्या पारड्यात जास्त मतं पडतात यावरच विजयाचे गणित निर्भर राहणार आहे.

सध्या दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत 14 उमेदवार एलिमिनेट झाले असून सुधाकर कोहळे यांची पहिल्या पसंती मध्ये असलेली 4291 मतांची आघाडी काही प्रमाणात कमी झाली आहे. थोड्या वेळानंतर नितेश कराळे यांच्या 24 हजार 249 मतामध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होईल. त्यामध्ये नितेश कराळे यांच्या मतामधील दुसरे पसंतीचे मत कोणाला बळ देतात? यावरच भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल.

या निवडणुकीत नागपूर शहर परिसरात सुमारे ६० टक्के तर चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली भागात ७१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. भाजपने एकदिलाने प्रचार केला होता. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचार केला. त्यामुळे मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुधाकर कोहळे यांना पहिल्याच फेरीत विजय मिळेल, असा विश्वास होता. मात्र रात्रीपर्यंत चित्र पालटत गेले आणि आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची वाट पाहावी लागत आहे.

Follow Us
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?