आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही… भर मंचावरून एकनाथ शिंदे असं का म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील कार्यक्रमातून विरोधकांवर जोरदार टीका करत शिवसेना पुन्हा राज्यभर सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त केला. "शिवसेना आपल्या दारी" या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित सभेत त्यांनी सरकारच्या योजनांसह पक्षाच्या भूमिकेवर भाष्य केले.
एकनाथ शिंदे यांनी दापोलीतील कार्यक्रमातून विरोधकांवर जोरदार टीका करत शिवसेना पुन्हा राज्यभर सक्रिय करण्याचा निर्धार व्यक्त केला. “शिवसेना आपल्या दारी” या उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित सभेत त्यांनी सरकारच्या योजनांसह पक्षाच्या भूमिकेवर भाष्य केले.
दापोलीतील सभेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “22 ला उठाव केला, त्याची नोंद जगाने घेतली. इतिहासात अशा उठाव कधीच झाला नाही. लोकांना वाटलं, हे कोणी निवडून येणार नाही. मी त्याच सभागृहात सांगितलं होतं की, कोणी निवडून आलं नाही, तर राजकीय निवृत्ती घेईल. त्यानंतर शेती करायला जाईल. तुमच्या एकनाथ शिंदेंनी चाळीसचे साठ आमदार केले.”
ते पुढे म्हणाले, “आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतो. आमचा अजेंडा खुर्ची नाही. तर आमचा अजेंडा सत्ता नव्हे, तर आमचा अजेंडा गोरगरीबांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणे.”
यावेळी त्यांनी रामदास कदम यांच्या कार्याचाही गौरव केला. तसेच, “जिथे संकट तिथे शिवसेना, आम्ही फेस टु फेस वाले आहे. फेसबुक लाईव्ह वाले नाहीत,” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Published on: Jul 26, 2026 03:03 PM
आम्ही फेस टु फेस वाले, तुम्ही... भर मंचावरून एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...

