AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : अँटी पेपर लीक विधेयकावर मंगळवारी चर्चेसाठी विरोधी पक्षांचे एकमत

| Edited By: | Updated on: Jul 28, 2026 | 11:03 AM
Share

Maharashtra News LIVE : हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुण्यात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

Maharashtra News LIVE : अँटी पेपर लीक विधेयकावर मंगळवारी चर्चेसाठी विरोधी पक्षांचे एकमत

पुण्यातील आंबेगाव परिसरात औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आंबेगाव पोलिसांनी इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आणला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नशेसाठी वापरण्यात येत असलेल्या मेपीवन या औषधी इंजेक्शनच्या 50 बाटल्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत. मेपीवन औषधी इंजेक्शन हे नशेसाठी आणि शरीरसौष्टवसाठी वापरले जाते अशी वैद्यकीय तज्ज्ञांची माहिती आहे. तर शिरुर तालुक्यात बिबट्याचा थरार पाहायला मिळाला आहे. शिरूर तालुक्यातील निमोणे–गुणाट रोडवरील गुणाट परिसरात ऊसाच्या शेतात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे गेल्या 4 ते 5 दिवसापासून सुरू असलेल्या जिल्ह्यातील 13 ते 14 धरणांतून पाण्याचा विसर्ग आज देखील कायम आहे. तर जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jul 2026 06:52 PM (IST)

    स्टिंग आणि रेड बुल सारख्या पेयांना यापुढे ‘एनर्जी ड्रिंक्स’ म्हटले जाणार नाही

    स्टिंग, रेड बुल, मॉन्स्टर, कॅम्पा एनर्जी किंवा हेल एनर्जी यांसारखी पेये पीत असाल, तर तुम्हाला लवकरच त्या बाटल्यांवर ‘एनर्जी ड्रिंक’ हे शब्द लिहिलेले दिसणार नाहीत. भारत सरकारने या कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवरून ‘एनर्जी ड्रिंक’ हा शब्द किंवा तत्सम शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) घेतला आहे.

  • 27 Jul 2026 06:40 PM (IST)

    गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचा पेपर फुटला?

    गुजरात येथील आयुर्वेद विद्यापीठात पेपरफुटी माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. तिसऱ्या वर्षाच्या शस्त्रक्रिया विभागाचा परीक्षा पेपर फुटल्याचं सांगण्यात येत आहे. परीक्षेपूर्वी सोशल मीडियावर ही प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप आहे. प्रश्नपत्रिकेतील 12 पैकी 11 प्रश्न व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळत होते. महाविद्यालय प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे.

  • 27 Jul 2026 06:30 PM (IST)

    उल्हासनगरमध्ये आईकडून 19 वर्षीय मुलीची हत्या

    उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आईने आपल्या 19 वर्षीय मुलीची हत्या केली आहे. प्रेमसंबंध असल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसात तपासात समोर आलं आहे. मुलगी घर सोडून जात असताना आईने ओढणीने मुलीचा गळा आवळला. मुलीच्या वडिलांनी स्वत:जाऊन पोलिसांनी ही माहिती दिली.

  • 27 Jul 2026 06:20 PM (IST)

    MPSCचा औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटला, रोहित पवारांचा आरोप

    एमपीएससीचा औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीतून हा पेपर फुटल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा पेपर एका पालकाने विकत घेतला होता, असा आरोपही केला आहे. तक्रार खरी की खोटी याची चौकशी करून पोलिसात तक्रार देणार, असं एमपीएससीकडून सांगण्यात आलं आहे.

  • 27 Jul 2026 06:06 PM (IST)

    अँटी पेपर लीक विधेयकावरील लोकसभेतील कोंडी फुटली, मंगळवारी चर्चेसाठी विरोधी पक्षांचे एकमत

    लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या पुढाकारामुळे आणि सभागृहातील सातत्यपूर्ण चर्चेमुळे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) विधेयक, 2026 वरील संसदेतील कोंडी संपुष्टात आली असून, सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी मंगळवारपासून या महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे.

  • 27 Jul 2026 04:55 PM (IST)

    कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांचं साम्राज्य! शाळेत जाताना चिमुकला जखमी

    कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यामुळे दुचाकी घसरून आई-मुलगा भर रस्त्यात पडले. कल्याण न्यायालयात कार्यरत ॲडव्होकेट जागृती जवेरी आपल्या अडीच वर्षीय मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना घडला अपघात.

  • 27 Jul 2026 04:40 PM (IST)

    बॅनरवर ओमराजे-तानाजी सावंतांचा फोटो नसल्यामुळे कार्यक्रमावर बहिष्कार

    धाराशिव जिल्हा परिषदेच्या वतीने आज धाराशिव येथे आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले होर्डिंग यावर शिवसेनेचे नेते माजी आरोग्य मंत्री आमदार तानाजीराव सावंत तसेच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो नसल्यामुळे बहिष्कार टाकण्यात आला आहे.

  • 27 Jul 2026 04:30 PM (IST)

    दुबईहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं एमर्जन्सी लँडिग

    दुबईहून मुंबईला येणाऱ्या इंडिगो विमानाचं एमर्जन्सी लँडिग करण्यात आले आहे. गुजरातमधील राजकोटच्या हिरासर एअरपोर्टवर लँडिग करण्यात आले. विमानाच्या सामान कक्षातून धूर येताना दिसल्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

  • 27 Jul 2026 04:20 PM (IST)

    नंदुरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

    नंदुरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्याविरोधात माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने विनयभंग आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा आरोप असलेली ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विजय चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 27 Jul 2026 04:11 PM (IST)

    मकोका गुन्ह्यातील फरार आरोपीला नागपूरमधून अटक

    यशोधरानगर पोलिसांनी मकोका गुन्ह्यातील फरार आरोपीला देशी कट्टा आणि धारदार चाकूसह अटक केली आहे. शानु उर्फ गोलू मनोज वैद्य असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न आणि मकोका गुन्ह्यातील हा आरोपी फरार होता. त्याला नागपूरमधून अटक करण्यात आली आहे.

  • 27 Jul 2026 03:55 PM (IST)

    पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर

    पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर. CBIकडून वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर. कोर्टाने डायरेक्टर प्रॉसिक्यूशनला NEET पेपर लीक प्रकरणासाठी वकिलाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. राऊज़ एव्हेन्यू कोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार.

  • 27 Jul 2026 03:45 PM (IST)

    संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन

    संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी विरोधक आक्रमक. अखिलेश यादव, राहुल गांधी आंदोलनात सहभागी

  • 27 Jul 2026 03:33 PM (IST)

    दिल्ली पोलिसांकडून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीसा

    दिल्ली पोलिसांकडून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीसा… पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याची नोटीस… सूत्रांची माहिती…

  • 27 Jul 2026 03:22 PM (IST)

    आता आम्ही MPSC आयोगाकडे जाणार- रोहित पवार

    तुकाराम मुंडे साहेबांचे काम या विभागात कसे आहे सर्वांना माहित आहे. आम्ही त्यांना पत्र दिले. त्याच दिवशी मुंडे साहेबांच्या कार्यालयाने पत्र पाठवले होते. परिक्षा पारदर्शक होणे फार महत्वाचे आहे. आम्ही दिलेले पत्र ते पुढे पाठवतील अशी आशा. आता आम्ही MPSC आयोगाकडे चाललो आहे. मगाशी एक पत्र दाखवले. हे पाहिल्यानंतर रुशिकेश दांगड मुंडे साहेबांना भेटला. त्या मुलाला धमकी दिली. त्यानी सांगीतली मी तक्रार मागे घेतली. पत्रात तो दोन गोष्टी आहे. दबाव आल्यावर तो बोलला मी चेष्टा करत होतो.

  • 27 Jul 2026 03:12 PM (IST)

    नागपुरात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा

    नागपुरात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा. महाराष्ट्रातील पेपरफुटी प्रकरणात दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. नागपुरातील कम्युनिस्ट पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मोर्चा. मोर्चात नागपुरातील CJPच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आलाय.

  • 27 Jul 2026 03:01 PM (IST)

    सोनम वांगचुक पत्नी गितांजलीसह राजघाटावर

    सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज, यानंतर ते महात्मा गांधीना अभिवादन करण्यासाठी सोनम वांगचुक राजघाटावर पोहोचले आहे. सोनम यांच्यासोबत त्यांची पत्नी गितांजलीही आहे,

  • 27 Jul 2026 02:55 PM (IST)

    अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेच्या याचिकेवर कोर्टने निकाल राखीव

    1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, सुप्रीम कोर्टात सुनावणी. अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेच्या याचिकेवर कोर्टने निकाल राखीव ठेवला आहे. ‘तुरुंगातील चांगल्या वर्तणुकीची सवलत शिक्षेतच गणली जावी.’ असा अबू सालेमच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद.

  • 27 Jul 2026 02:50 PM (IST)

    पुण्यात तब्बल 373 व्यावसायिक मिळकतींवर प्रशासनाने आता बुलडोझर फिरवले

    पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील खराबवाडी येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या तब्बल ३७३ व्यावसायिक मिळकतींवर प्रशासनाने आता बुलडोझर फिरवण्यात आला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात येत आहे. कारवाई दरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी अडीशेहून अधिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 27 Jul 2026 02:40 PM (IST)

    पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कंडारी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

    राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला.शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली.यावेळी ग्रामस्थ आणि नागरिकांनीही या उपक्रमात सहभागी होत पर्यावरण पर्यावरण संवर्धानाचा संदेश दिला.वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे जतन करण्याचा संकल्प केला.

  • 27 Jul 2026 02:35 PM (IST)

    आमदार रोहित पवार तुकाराम मुंडेच्या भेटीला

    आमदार रोहित पवार तुकाराम मुंडेच्या भेटीला. MPSC औषध निरीक्षक गळतीचा पेपर फुटला तर या प्रकरणी ही भेट होत आहे. तर पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची संध्याकाळी सहा वाजता भेट घेणार आहेत.

  • 27 Jul 2026 02:30 PM (IST)

    पुणे अहिल्यानगरकडून मुंबईच्या दिशेने प्रवासाला निघणार असाल, तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी

    पुणे अहिल्यानगरकडून मुंबईच्या दिशेने प्रवासाला निघणार असाल, तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील जुन्नर तालुक्यातील करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्यामुळे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक बंद करण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. माळशेजघाट बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता आळेफाटा – नारायणगाव – खेड – चाकण – तळेगाव (MIDC) – लोणावळा – खोपोली – मुंबई अशा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे, जर तुम्ही आज या मार्गाने प्रवास करणार असाल, तर कृपया नोंद घ्या आणि प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करा!

  • 27 Jul 2026 02:20 PM (IST)

    शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा कार्यक्रमावर बहिष्कार

    शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा कार्यक्रमावर बहिष्कार, स्वागताच्या बॅनरवरती खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार तानाजी सावंत यांचा फोटो टाळल्यामुळे बहिष्कार धाराशिव जिल्हा परिषद च्या वतीने आज धाराशिव येथे आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 या कार्यक्रमाचे आयोजन. कार्यक्रमाच्या ठिकाणी लावलेले होर्डिंग यावर शिवसेनेचे नेते माजी आरोग्य मंत्री आमदार तानाजीराव सावंत तसेच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो नसल्यामुळे बहिष्कार

  • 27 Jul 2026 02:09 PM (IST)

    राज्य सभेपाठोपाठ आता लोकसभेचे कामकाजही स्थगित

    परीक्षा सुदारणा विधेयक सादर, लोकसभेत विरोधकांचा पुन्हा गदारोळ. राज्य सभेपाठोपाठ आता लोकसभेचे कामकाजही स्थगित. आता लोकसभेचे काम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. तर राज्यसभेचे कामकाज तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

  • 27 Jul 2026 02:00 PM (IST)

    सोलापुरात SC उपवर्गीकरणाविरोधात विराट महामोर्चाचे आयोजन

    सोलापुरात SC उपवर्गीकरणाविरोधात विराट महामोर्चाचे आयोजन. SC आरक्षणाचे उपवर्गीकरण करू नये या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येतोय. रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समोरचा काढण्यात येतो. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने हा मोर्चा लढण्यात येतोय. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यात उपवर्गीकरण करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार SC आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे वर्गीकरण करण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहे. त्याला विरोध दर्शवण्यासाठी हा विराट महामोर्चा काढण्यात येतोय

  • 27 Jul 2026 01:50 PM (IST)

    पेपरफुटीविरोधी विधेयकाबाबत रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

    पेपरफुटीविरोधी विधेयकाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “पेपर लीकच्या घटना रोखण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी हे विधेयक आणलं जात आहे. मोदी सरकारने अतिशय चांगलं पाऊल उचललं आहे. पेपर लीक प्रकरणात सहभागी असलेल्यांना यापूर्वीच तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. गोंधळ घालणं हे विरोधी पक्षाचं काम आहे.”

  • 27 Jul 2026 01:40 PM (IST)

    उद्या सकाळी NDA च्या सर्व खासदारांची बैठक

    उद्या सकाळी NDA च्या सर्व खासदारांची बैठक पार पडणार आहे. सकाळी 9.30 वाजता संसदेतील बालयोगी सभागृहात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार आहेत.

  • 27 Jul 2026 01:35 PM (IST)

    आमच्याकडे आलेले पुरावे पूर्णपणे खरे आहेत; MPSC पेपरफुटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

    बनाव रचला असं बोलणाऱ्या लोकांना का फसवलं विचारा. आमच्याकडे आलेले पुरावे पूर्णपणे खरे आहेत असं आमचं मत आहे. 100 पैकी 90 प्रश्न सारखे असतील तर पेपर फुटला म्हणावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले आहेत. MPSC पेपरफुटीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • 27 Jul 2026 01:32 PM (IST)

    दादरमध्ये आंदोलनादरम्यान पोलिसांची व्हॅन अडवणाऱ्या रियाची पोलिसांत तक्रार

    NEET पेपर लीक विरोधातील आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गाडीसमोर उभे राहून चर्चेत आलेली मॉडेल आणि इन्फ्लुएंसर रिया यादव अहिर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आंदोलनात रियाने धाडस दाखवत पोलिसांच्या गाडीला थांबवलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. आता रियाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर तिला धमकीचे मेसेज आणि अश्लील कमेंट्स येत आहेत.

  • 27 Jul 2026 01:20 PM (IST)

    सोनम वांगचूक यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज

    सोनम वांगचूक यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन अभिवादन करून ते लडाखला परतणार आहेत. वांगचूक यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि सर्व स्टाफचे आभार मानले आहेत.

  • 27 Jul 2026 01:15 PM (IST)

    उद्धव ठाकरेंचा वाढदिवस; राज ठाकरे ‘मातोश्री’वर दाखल

    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष आणि बंधू राज ठाकरे ‘मातोश्री’ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

  • 27 Jul 2026 01:06 PM (IST)

    NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

    अहिल्यानगरमधील जलालपूर इथली विद्यार्थिनी अंकिता सांगळे हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने नैराश्यातून आत्महत्येचा प्राथमिक अंदाज आहे. कर्जत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी ही माहिती दिली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

  • 27 Jul 2026 12:53 PM (IST)

    MPSC पेपर फुटल्याची तक्रार बनावट?

    MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. MPSC  औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार बनवाट असल्याची माहिती  MPSC मधील सूत्रांनी दिली आहे.  पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून  पेपर फुटल्याचा बनवा केला. तक्रारीचा ई-मेल बनावट असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • 27 Jul 2026 12:47 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे पोहोचले ‘मातोश्री’वर , उद्धव ठाकरेंना देणार शुभेच्छा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले . उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज ठाकरे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील. राज ठाकरे हे मातोश्रीवर येण्याचं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षीही त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

  • 27 Jul 2026 12:21 PM (IST)

    रोहित पवार आज दुपारी घेणार तुकाराम मुंढे यांची भेट

    रोहित पवार आज दुपारी 2 वाजता तुकाराम मुंढे यांची भेट घेणार आहेत, तसेच पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनाही आज संध्याकाळी रोहित पावर भेटणार आहेत.  MPSC औषध निरीक्षक भरतीचा  पेपर फुटल्याप्रकरणी ही भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

  • 27 Jul 2026 12:09 PM (IST)

    परीक्षा सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत सादर

    पेपरफुटीसंदर्भात नवीन विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं.  परीक्षा सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत सादर  करण्यात आलं. मात्र विरोधकांचा गोंधळ, गदारोळ कायम.  विधेयकाला विरोध करू इच्छिता का ?  लोकसभा अध्यक्षांचा सवाल. मात्र गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

  • 27 Jul 2026 12:07 PM (IST)

    लोकसभेत विरोधकांचा गोंधळ, सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू

    लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू झालं असून विरोधकांचा गोंधळ कायम आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून विरोधक आक्रमक झाले असून  सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 27 Jul 2026 12:00 PM (IST)

    बुलढाण्यावर पाणीटंचाईचं संकट, धरणांत केवळ 26 टक्के पाणीसाठा

    बुलढाणा जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावतय. जिल्ह्यात दोन महिन्यानंतरही तीन मोठे, सात मध्यम आणि ४१ लघु प्रकल्पांमध्ये केवळ 26 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यात मागील दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 27 Jul 2026 11:49 AM (IST)

    महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करणार – महादेव जानकर

    महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करणार. तर नीट पेपरफुटी, राम मंदिर दानपेटी चोरीत भाजपचे लोक आहेत, असा गंभीर आरोप जानकर यांनी केला. महादेव जानकर यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

  • 27 Jul 2026 11:39 AM (IST)

    पार्थ पवार यांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी

    पार्थ पवारांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याचे नियोजन करण्यात आलं आहे. पक्षातील सगळे आमदार खासदार आणि मोजक्या माजी आमदारांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आलं आहे.

  • 27 Jul 2026 11:30 AM (IST)

    माजी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान संसदेत, विरोधकांची घोषणाबाजी

    माजी केंद्रीय मंत्री, खासदार धर्मेंद्र प्रधान हे अधिवेशनासाठी संसदेत आले. त्यावेळी विरोधकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेतील आवारात राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं.

  • 27 Jul 2026 11:04 AM (IST)

    लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू

    संसदेत लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरू झालं आहे. जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे संसेदचं कामकाज ठप्प पडलं होतं. त्यानंतर धर्मेद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदा सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. परंतु पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सरकार विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

  • 27 Jul 2026 10:50 AM (IST)

    पुण्यात स्टेशन परिसरात साधू वासवानी चौकात भर रस्त्यावर पडलेत खड्डेच खड्डे…..

    भर रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता : महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना गाडी चालवताना करावी लागत आहे कसरत. भर रस्त्याच्या मध्ये खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीची देखील जाणवत आहे समस्या. रस्त्यावर खड्ड्यात पाणी साठल्याने वाहन चालकांना गाडी चालवताना घ्यावा लागत आहे अंदाज.. महापालिका प्रशासन खड्डे कधी बुजावणार असा सवाल नागरिक करताना दिसत आहे

  • 27 Jul 2026 10:40 AM (IST)

    रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू, धक्कादायक घटना..

    वाशिम जिल्ह्यातील जऊलका रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुबवेळ परिसरात रेल्वेतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच जऊलका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, तो कोणत्या रेल्वेतून पडला आणि ही घटना नेमकी कशी घडली, याचा तपास जऊलका पोलीस करत आहेत.

  • 27 Jul 2026 10:30 AM (IST)

    कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याने जीवन संपविले

    राळेगाव तालुक्यातील भांब येथील मनाला चटका लावणारी घटना. यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाचा संसार उद्ध‌वस्त. मध्यवर्ती बँक राळेगाव येथे लागलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याच्या नैराश्यातून राळेगाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी राजू बापुराव चुड्डुके (४९) यांनी विष प्राशन करून जीवन संपवले. कर्जमाफीची यादी लागली, आशा संपली, जीव गेल्याची मनाला चटका लावणारी घटना

  • 27 Jul 2026 10:20 AM (IST)

    प्रल्हाद जोशी यांचा शिक्षणासोबत काय संबंध- संजय राऊत

    नुकताच संजय राऊत यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, प्रल्दाद जोशी यांचा शिक्षणाबद्दल काय संबंध आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणून कारभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आला.

  • 27 Jul 2026 10:08 AM (IST)

    किती मंत्र्यांची मुले विदेशात शिकत आहेत हे जाहीर करा- संजय राऊत

    नुकताच संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, किती मंत्र्यांची मुले विदेशात शिकत आहेत, हे जाहीर करा.

  • 27 Jul 2026 10:04 AM (IST)

    वारणा धरण 82 टक्क्यांवर, धरणात 8,126 क्युसेक पाण्याची आवक

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. आज सकाळी वारणा धरण 82.62 टक्के भरले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 28.42 टीएमसी आहे गेल्या 24 तासांत धरण परिसरात 48 मिमी पावसाची नोंद झाली असून, वाढत्या आवकेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विद्युतगृहातून 1,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे.

  • 27 Jul 2026 09:55 AM (IST)

    वारणा धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ

    सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा खोऱ्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. आज सकाळी वारणा धरण 82.62 टक्के भरले आहे. धरणातील एकूण पाणीसाठा 28.42 टीएमसी आहे, गेल्या 24 तासांत धरण परिसरात 48 मिमी पावसाची नोंद झाली असून, वाढत्या आवकेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विद्युतगृहातून 1,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात करण्यात येत आहे.

  • 27 Jul 2026 09:53 AM (IST)

    कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याने जीवन संपविले

    यवतमाळ येथे कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याने जीवन संपविले. राळेगाव तालुक्यातील भांब येथील मनाला चटका लावणारी घटना. यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबाचा संसार उद्ध‌वस्त. मध्यवर्ती बँक राळेगाव येथे लागलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव न आल्याच्या नैराश्यातून राळेगाव तालुक्यातील भांब येथील शेतकरी राजू बापुराव चुड्डुके (49) यांनी विष प्राशन करून जीवन संपवले.

  • 27 Jul 2026 09:13 AM (IST)

    बदनापूर नगरपंचायतच आता कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र

    जालना जिल्ह्यातील बदनापूर नगरपंचायतच आता कचऱ्याच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून आलं. नगरपंचायत कार्यालयाच्या मुख्य इमारती शेजारीच मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त कचरा साचल्याने या परिसरातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जातं आहे.

  • 27 Jul 2026 09:08 AM (IST)

    MPSC परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा

    एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेवर प्रश्नपत्रिका फुटीचा गंभीर आरोप. अहिल्यानगरच्या ऋषिकेश गांगर्डे यांचा धक्कादायक दावा. परीक्षेच्या दोन दिवस आधीच काही उमेदवारांकडे प्रश्न-उत्तरे असल्याचा आरोप. व्हॉट्सअॅपद्वारे संभाव्य उत्तरे पाठविल्याचा दावा. पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचाही आरोप. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

  • 27 Jul 2026 08:57 AM (IST)

    पुण्याच्या राजगुरुनगर येथील एका पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित इंधन मिळत असल्याचा आरोप

    पुण्याच्या राजगुरुनगर येथील एका पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित इंधन असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे इंधन गाड्यांमध्ये भरल्याने अनेक वाहने बंद पडली आहे त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करवा लागला आहे. बाटलीत पेट्रोल घेतल्यानंतर या मध्ये पाणी मिश्रित असल्याची बाब समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • 27 Jul 2026 08:50 AM (IST)

    पुणे शहरात डेंगूच्या रुग्णात लक्षणीय वाढ…

    पुणे शहरात डेंगूच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे. महापालिकेच्या आकडेवारीवरून डेंगूच्या रुग्णात वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे. अवघ्या दीड महिन्यात एकूण 300 संशयित डेंगू रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. पावसामुळे विविध ठिकाणी साचणारे पाणी त्यातून होणारी डासांची पैदास आणि बदलते हवामान यामुळे डेंगूचा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

  • 27 Jul 2026 08:40 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी; पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

    जळगाव जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील  तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आठवडाभरापासून पावसाचा मुक्काम कायम असून गेल्या आठवडाभरापासून मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सध्या झालेल्या या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून पिकांची स्थिती उत्तम असल्याने शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. सध्या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २३ टक्के पावसाची तूट असून २३ टक्के पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता.

  • 27 Jul 2026 08:30 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो

    नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाला आहे.  दिंडोरी नगरपंचायत, कसबे वणी व परिसरातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असून उन्हाळ्यातील पाणीटंचाईनंतर धरण भरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात शेती व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार. ओझरखेड धरण भरल्याने लखमापूर औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्याचाही प्रश्न सुटलाा आहे.

  • 27 Jul 2026 08:25 AM (IST)

    साता समुद्रापार इंग्लंडमध्येही दुमदुमला विठ्ठल नामाचा गजर

    छत्रपती संभाजीनगर : साता समुद्रापार इंग्लंडमध्येही विठ्ठल नामाचा गजर दुमदुमला आहे.  बेसिंगस्टोकमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी झाली . मराठी बांधवांनी टाळ-मृदुंग, दिंडी आणि अभंगांनी सोहळा रंगवला. परदेशातही महाराष्ट्राच्या वारीची परंपरा जपली  गेली.

  • 27 Jul 2026 08:20 AM (IST)

    नांदेड – भरधाव कारने दोन दुचाकींना उडवले,एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी, घटना सिसिटीव्हीत कैद

    हिमायतनगर–भोकर राष्ट्रीय महामार्गावरील सोनारी फाटा येथे भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे. या अपघातात सोनारी येथील जिकरान शेख सिराज आणि शेख सोहेल शेख जहीर हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना सरसम येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले. मात्र नांदेडला नेत असताना शेख सोहेल शेख जहीर यांचा मृत्यू झाला आहे. तर शेख जिकरान शेख सिराज यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 27 Jul 2026 08:12 AM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात शुभेच्छांच्या बॅनरबाजीची चर्चा

    कुणी पक्ष बदलले कोणी झेंडे बदलले परंतु आम्ही ना पक्ष बदलला ना झेंडा बदलणार इमान विकला नवसाला पावला नाही म्हणून देव बदलणारी आमची अवलाद नाही मातोश्री परिसरात बॅनरमधून राजकीय संदेश… कलानगर आणि मातोश्री परिसरात शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा बॅनर झळकले आहेत.

  • 27 Jul 2026 08:11 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो

    नाशिक जिल्ह्यातीलदिंडोरी येथील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाला आहे.  दिंडोरी नगरपंचायत, कसबे वणी व परिसरातील ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.  उन्हाळ्यातील पाणीटंचाईनंतर धरण भरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  आगामी काळात शेती व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.  ओझरखेड धरण भरल्याने लखमापूर औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्याचाही प्रश्न सुटला आहे.

  • 27 Jul 2026 08:08 AM (IST)

    दोन दिवसाच्या विश्रांती नंतर विरार मध्ये पावसाची रिमझिम सुरू

    दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर विरारमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. पहाटे पासून पावसाने रिमिझिम सुरू झाली असून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहेत. हवेत गारवा पसरला असून, आभाळ भरून आलेले आहे.

Published On - Jul 27,2026 8:05 AM

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार