खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
मुंबईत आज ठाकरे बंधूंच्या तिरंगा मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. कॉक्रोच जतना पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. यानंतर अगोदरच जाहीर करण्यात आलेला तिरंगा मोर्चा जल्लोष सभेत बदलण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह अबालवृद्धांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मनसे आणि उद्धव सेनेच्या संयुक्त आयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा उल्लेख “खड्डामंत्री” असा करताच सभेत एकच हशा पिकला. त्यांचे हे वक्तव्य उपस्थितांच्या चर्चेचा विषय ठरले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी NEET पेपरफुटीनंतर आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढील आंदोलन कोणत्या विषयावर होणार याचाही स्पष्ट इशारा दिला. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार तसेच दोन्ही पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Published on: Jul 26, 2026 01:43 PM
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या