आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतरमंतर गाठत कॉक्रोज जनता पार्टीचे नेते अभिजित दीपके यांची भेट घेत त्यांना लढण्यासाठी बळ दिले. आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही घाबरु नका असा वडीलकीचा सल्ला यावेळी ठाकरे यांनी त्यांना दिला.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा
Uddhav Thackeray met Abhijit Deepke in Delhi
| Updated on: Jul 22, 2026 | 7:01 AM

काँग्रेसने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. त्यानंतर रात्री उशीरा शिवसेना नेते उद्धव ठाकरे दिल्लीत जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांच्या सोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांची भेट घेत त्यांना आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका असा वडीलकीचा सल्ला दिला.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी रात्री उशीरा जंतरमंतरवर दाखल होत सीजेपीच्या अभिजीत दीपके यांची भेट घेतली. यावेळी दीपके यांनी उद्धव ठाकरे यांचा हात धरुन त्यांना स्टेजवर नेले. उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे बिनीचे शिलेदार होते. उद्धव ठाकरे आणि अभिजीत दीपके यांनी मंचावरुन हात उंचावत जंतरमंतरवरील तरुणांना अभिवादन केले.

फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही…

फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर व्यवस्था बदलली पाहिजे. सत्ताबदल केल्याशिवाय तुमच्या जीवनात बदल होणार नाही. तुम्ही बिनधास्त आंदोलन करा आम्ही तुमच्या सोबत आहोत असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचा एक युवक तुमचे नेतृत्व करत आहे. याचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही घाबरु नका, काल तुम्ही जी हिंमत दाखवली त्याला मी नमन करतो असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.. आज सारी दिवारे तुट चुकी आहे. तुमच्या आमच्यातील जातीधर्माच्या सर्व भिंती उभ्या केल्या होत्या त्या आता तुटल्या आहे. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे. नेशन, वन इमोशन झाले आहे. आम्ही तुमच्यासोबत होतो, आहोत आणि शेवटपर्यंत लढू असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us