महिला मंत्र्याच्या नवऱ्याचे कांड! थेट Gfसोबतची क्लिप… प्लान समोर येताच सर्वत्र खळबळ
Minister Rekha Arya: एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिला मंत्र्याने व्हिडीओ शेअर करत पतीवर गंभीर आरोप केले आहेत. पतीचे अनेक महिलांसोबत शारीरिक संबंध असून त्याने Gfसोबत मिळून मोठा प्लान आखला होता.

देशात दिवसेंदिवर विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे सतत कानावर येत आहेत. कोणी पतीला फसवनू जावयासोबत पळून गेले आहे तर कुठे महिलांनी नवऱ्याला Gfसोबत पकडले आहे. पण असेच एक देशात हादरुन टाकणारे प्रकरण समोर आले आहे. एका महिला मंत्र्याने व्हिडीओ शेअर करत थेट नवऱ्यावर आरोप केले आहेत. नवऱ्याने गर्लफ्रेंडसोबत मिळून त्यांना मारण्याचा डाव आखल्याचा देखील आरोप त्यांनी तक्रारीमध्ये केले आहे.
उत्तराखंडातील महिला आणि बाल कल्याण मंत्री रेखा आर्या यांनी गुरुवार संध्याकाळी देहरादूनच्या कँट कोतवालीमध्ये नवरा गिरधारी लाल साहू उर्फ पप्पू गिरधारी यांच्याविरुद्ध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रेखा यांनी आरोप केला की त्यांच्या नवऱ्याने विवाहित असूनही फसवून दुसरे लग्न केले आणि त्यांना जिवे मारण्याचा कटही रचला होता. तसेच गिरधारी लाल साहू यांचे इतर अनेक महिलांशीही संबंध आहेत.
‘खोटे बोलून केले होते लग्न’
यमुना कॉलनीस्थित मंत्री निवासस्थानी राहणाऱ्या रेखा आर्या यांनी तक्रारीत सांगितले की, ६ जुलै २००४ रोजी त्यांचे लग्न गिरधारी लाल साहू (रा. बदायूं बरेली रोड, जोगी नवादा, बरेली, उत्तर प्रदेश) यांच्याशी झाले होते. साहू यांनी स्वतःला अविवाहित सांगून आणि त्यांना फसवून लग्न केले. काही वर्षांनंतर गिरधारी आधीच विवाहित असल्याचे आणि पहिल्या लग्नातून मुले असल्याचे सत्य समोर आले. आतापर्यंत त्यांनी मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने नातेवाईकांच्या समजूतदारपणामुळे गप्प राहण्याचा निर्णय घेतला होता.
‘अनेक महिलांशी संबंध’
तक्रारीनुसार, आर्या यांचा आरोप आहे की गिरधारी यांचे अनेक महिलांशी अवैध संबंध आहेत. याबाबत आक्षेप घेतल्यावर आरोपीने लेखी आणि तोंडी माफी मागितली, पण त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. विरोध केल्यावर त्याने मारहाण आणि शिवीगाळ केली. सरकारी निवासस्थानी कर्मचारीवर्गाच्या समोर अपमानजनक जातसूचक शब्दांचा वापर केला. तक्रारीत म्हटले आहे की आरोपीने बनावट सही आणि खोटे कागदपत्रे वापरून त्यांना कोणत्याही राजीनाम्याशिवाय संबंधित कंपन्यांच्या संचालकपदावरून सेवानिवृत्त झाल्याचे दर्शवले.
‘जिवे मारण्याचा कट रचला’
अलीकडे मंत्री रेखा यांना एक ऑडिओ मिळाला. त्यात गिरधारी एका महिलेशी बोलताना त्यांना जिवे मारण्याचा कट रचत असल्याचे स्पष्ट होते. आर्या यांनी स्वतःची आणि आपल्या अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात असल्याचे सांगत कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. एसपी सिटी शेखर सुयाल यांनी सांगितले की मंत्र्यांच्या तक्रारीवर त्यांच्या पतीविरुद्ध खटला दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या कलमांखाली खटला
भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब, ३२३, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४९५, ४९८-अ, ५०४ आणि ५०६. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम ३ (१) (द), ३(१) (ध) आणि ३(२).