माझ्या पतीचे एका महिलेशी… महिला मंत्र्यांच्या आरोपाने एकच खळबळ, हादरवून टाकणारी ऑडियो क्लिप बाहेर!

स्रियांचा देवी म्हणून गौरव केला जातो. त्यांच्या स्वातंत्र्य आणि सक्षमीकरणाच्या गप्पा मारल्या जातात परंतू प्रत्यक्षात घरात याच महिलेला कशी वागणूक दिली जाते याचे एक मासेलवाईक उदाहरण म्हणून उत्तराखंडातील हे मंत्र्याचे प्रकरण आहे.

माझ्या पतीचे एका महिलेशी… महिला मंत्र्यांच्या आरोपाने एकच खळबळ, हादरवून टाकणारी ऑडियो क्लिप बाहेर!
uttarakhand minister rekha arya filed fir against husband
| Updated on: Oct 15, 2026 | 10:56 PM

उत्तराखंडातील महिला आणि बाल कल्याण मंत्री असलेल्या रेखा आर्य यांच्यावर स्वत:वरच अन्याय झाल्याचे दुखणे मांडावे लागले आहे.मंत्री रेखा आर्य यांनी त्यांचे पती गिरधारी लाल साहू यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. मंत्री रेखा आर्य यांनी स्वत:च्या आणि मुलांच्या सुरक्षे संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. मंत्री रेखा आर्य यांनी पतीवर पहिले लग्न लपवल्याचा, दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवण्याचा, शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा आणि जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे त्यांची तब्येतही बिघडली आहे.त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेखा आर्या यांनी या प्रकरणात एका ऑडिओ रेकॉर्डिंगचाही उल्लेख केला आहे. ज्यामुळे त्यांनी त्यांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यासाठी मजबूर केले आहे. तसेच स्वत:ची बाजू मांडण्यासाठी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.त्यात रेखा आर्या रडत..रडत आपल्यावरील अन्यायाची सर्व कहाणी सांगत आहे.

Loading...

 

FIR च्या मते, मंत्री आर्या यांनी आरोप केला आहे की त्यांचे पती गिरधारी लाल साहू यांनी लग्नाच्या वेळी त्यांचे पहिले लग्न झाल्याचे लपवले होते. त्यांच्या पतीचे दुसऱ्या महिलांशी संबंध आहेत. त्यांनी दावा केला की त्यांना शारीरिक आणि मानसिक रुपाने छळले जात आहे. तसेच जीवेमारण्याची धमकी दिली आणि जातीवाचक शब्दाचा वापर केल्याचा आरोप रेखा आर्या यांनी पतीवर केला आहे.

मंत्री रेखा आर्या यांनी एक ऑडिओ रेकॉर्डिंगचा उल्लेख करत त्यांना जीवे मारण्याचा कटासंबंधी माहिती दिली आहे. त्यांचे मते या ऑडिओने त्यांना आतून हादरवले आहे. यानंतर त्यांनी आपली आणि आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी पोलिसात जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगत पतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

रेखा आर्या यांनी पतीवर कंपनीच्या संचालक पदावरुन त्यांना हटवण्यासाठी त्यांच्या हस्ताक्षरांचा कथितपणे गैरवापर करण्याचा आरोप देखील केला आहे. त्यांच्यानुसार या प्रकरणात देखील त्यांच्या सोबत चुकीचा प्रकार केला. मंत्री रेखा आर्या यांनी आपल्या पतीवर आरोप करताना आपल्या दीर्घकाळ सुरु असलेल्या वादाकडे लक्ष वेधले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us