हे G-20 म्हणजे नेमके असते तरी काय? ज्यात पंतप्रधान मोदी झाले आहेत सामील

| Updated on: Nov 15, 2022 | 3:15 PM

इंडोनेशियाच्या बालीमध्ये G20 परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. G20 परिषद म्हणजे काय हे जाणून घेऊया.

हे G-20 म्हणजे नेमके असते तरी काय? ज्यात पंतप्रधान मोदी झाले आहेत सामील
इंडोनेशिया
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, वार्षिक G20 शिखर परिषद आज म्हणजेच मंगळवारपासून बाली, इंडोनेशिया येथे सुरू झाली आहे. यामध्ये कोविड-19 या जागतिक महामारीमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला यावर चर्चा करण्यात आली. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी (PM Modi) जागतिक पातळीवरील आव्हानात्मक वातावरणात G20 च्या नेतृत्वासाठी इंडोनेशियाचे (Indonesia) कौतुक केले, हवामान बदल, कोविड-19 जागतिक महामारी आणि युक्रेनचा उल्लेख केला. काही घडामोडींमुळे जगभरात हाहाकार माजला असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असा आहे की, हे जी-20 काय आहे (What is G20) ज्यावर संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्या आहेत.

 

काय आहे G20?

G20 ला ग्रुप ऑफ ट्वेंटी असेही म्हणतात. हा युरोपियन युनियन आणि 19 देशांचा अनौपचारिक गट आहे. त्याचे नेते दरवर्षी G20 शिखर परिषदेत एकत्र येतात आणि जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे कसे आणायचे यावर चर्चा करतात. त्याची स्थापना 1999 साली झाली. तसेच, हा एक मंत्री मंच आहे जो G7 ने विकसित आणि विकसनशील दोन्ही अर्थव्यवस्थांच्या सहकार्याने स्थापन केला होता.

हे सुद्धा वाचा

म्हणून केली g20 ची स्थापना

जेव्हा ती स्थापन झाली तेव्हा ती अर्थमंत्र्यांची आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरांची संघटना होती. त्याच्या पहिल्या परिषदेबद्दल सांगायचे झाल्यास, ही परिषद  डिसेंबर 1999 मध्ये जर्मनीची राजधानी बर्लिन येथे आयोजित करण्यात आली होते. विशेष म्हणजे 2008 साली जगाला भयानक मंदीचा सामना करावा लागला. यानंतर या संघटनेतही बदल झाले आणि तिचे रूपांतर आघाडीच्या नेत्यांच्या संघटनेत झाले. यानंतर G20 राष्ट्रांच्या नेत्यांची वर्षातून एकदा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2008 साली अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे आयोजित करण्यात आली होती. तर G-20 मध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स अमेरिकेचा समावेश आहे.

हा आहे उद्देश आहे

या व्यासपीठाचा सर्वात मोठा उद्देश आर्थिक सहकार्य आहे. यात सामील असलेल्या देशांचा एकूण जीडीपी जगभरातील देशांच्या 80 टक्के आहे. गट आर्थिक रचनेवर एकत्र काम करतात. तसेच आर्थिक स्थैर्य, हवामानातील बदल आणि आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाते. परिषदेचा मूळ उद्देश आर्थिक परिस्थिती कशी स्थिर ठेवायची आणि कशी टिकवायची हे आहे. यासोबतच हे व्यासपीठ जगाच्या बदलत्या परिस्थितीचाही विचार करते आणि त्यासंबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरही लक्ष केंद्रित करते. त्यात व्यापार, शेती, रोजगार, ऊर्जा, भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई, दहशतवाद आदी मुद्द्यांचाही समावेश आहे.