सर्वात जास्त स्ट्राँग दारू कोणती? तुम्ही पिता त्या ब्रँडमध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती?

मद्यपी लोकांमध्ये दारूच्या ब्रँड बाबत नेहमीच चर्चा होत असते. कोणाला कुठलाही दारूचा ब्रँड आवडू शकतो, परंतु तुम्हाला हे माहिती आहे काय? जगातील सर्वात जास्त स्ट्राँग दारूचा ब्रँड कोणता आहे? आणि त्यामध्ये किती अल्कोहोल आहे ते?

सर्वात जास्त स्ट्राँग दारू कोणती? तुम्ही पिता त्या ब्रँडमध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती?
दारूचा सर्वात जास्त स्ट्राँग ब्रँड कोणता?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 18, 2026 | 5:47 PM

जेव्हा जगातील सर्वात स्ट्रॉग दारूच्या ब्रँडवर चर्चा होते, त्यावेळी त्या दारूच्या ब्रँडमध्ये किती टक्के अल्कोहोलचं प्रमाण आहे, हे पाहिलं जातं. सध्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या विविध कंपनींच्या बिअरच्या बाटल्यांमध्ये सर्वसाधारणपणे 4-8 टक्के अल्कोहोल असतं. तर वाइनमध्ये 10-15 टक्के अल्कोहोल असतं. व्हिस्की, रम आणि व्होडका यासारख्या दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे इतर ब्रँडच्या तुलनेनं जास्त असतं. यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण हे 35-45 टक्क्यांपर्यंत असू शकतं. मात्र जगात असे देखील काही दारूचे ब्रँड आहेत, ज्यामध्ये अति प्रचंड प्रमाणात अल्कोहलचं प्रमाण असतं. जगातील सर्वात जास्त स्ट्रॉग दारूमध्ये स्पिरिटस रेक्टिफिकोवानी’ (Spirytus Rektyfikowany) ही प्रथम क्रमांकावर आहे. या दारूच्या प्रति 100 मिलिटिटरमध्ये जवळपास 96 टक्के इथेनॉल असतं. ही दारू पोलंडमध्ये उत्पादित केल्या जाते. पोलंडमध्ये या दारूचे कारखाने आहेत.

सर्वसाधारणपणे ज्या दारूला स्ट्राँग मानलं जातं, त्या सर्व प्रकारच्या ब्रँडमध्ये जास्तीत जास्त 35-45 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असतं, परंतु पोलंडमध्ये निर्माण होणाऱ्या स्पिरिटस रेक्टिफिकोवानी या दारूमध्ये चक्क प्रति 100 मिलीलीटरमध्ये 96 टक्के अल्कोहोल असंत, यावरून हा मद्याचा प्रकार किती स्ट्रॉग असेल याची कल्पना येऊ शकते. याच कारणामुळे ही दारू थेट पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत नाही. तर या दारूचा वापर हा फळाची वाईन आणि इतर उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. या दारूचे उत्पादक देखील तसाच सल्ला आपल्या ग्राहकांना देतात. ही दारू थेट पिता येत नाही.

Loading...

दुसऱ्या क्रमांकावर कोणती दारू?

सर्वात जास्त स्ट्राँग दारूमध्ये पहिला क्रमांक हा पोलंडमध्ये निर्माण होणाऱ्या स्पिरिटस रेक्टिफिकोवानी या दारूचा लागतो, त्यामध्ये 96 टक्के अल्कोहोल असंत. तर दुसरा नंबर हा अमेरिकेमध्ये उत्पादित होणाऱ्या Everclear 190 या दारूच्या ब्रँण्डचा लागतो. यामध्ये जवळपास 95 टक्के अल्कोहोल असतं. याशिवाय दारूचा आणखी एक महत्त्वाचा ब्रँड असलेल्या Golden Grain 190 मध्ये देखील 95 टक्के अल्कोहोल असंत. परंतु शक्यतो या सर्व प्रकारच्या दारू ज्यामध्ये अल्कोहोलच प्रमाण हे 90 टक्क्यांपेक्षा अधिक असतं, अशी दारू न पिण्याचा सल्ला दिला जातो. या दारूचा उपयोग हा प्रक्रिया उद्योगांमध्ये कोला जातो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us