India-China : चीन्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे, त्यांची दादागिरी मोडून काढणारे हे शौर्य कमांडोज कोण आहेत?

India-China : भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये चकमकी सुरु आहेत. ITBP चे महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात भाष्य केल्यामुळे भारतीय-चीन नियंत्रण रेषेवरील परिस्थिती समोर आली आहे.

India-China : चीन्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारे, त्यांची दादागिरी मोडून काढणारे हे शौर्य कमांडोज कोण आहेत?
ITBP
Image Credit source: X/NetramDefence)
| Updated on: Oct 23, 2026 | 5:45 PM

मागच्या काही दिवसापासून अरुणाचल प्रदेशमध्ये विविध भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमकी सुरु आहेत. ITBP चे महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात भाष्य केल्यामुळे भारतीय-चीन नियंत्रण रेषेवरील परिस्थिती समोर आली आहे. या संघर्षामुळे ITBP ने बनवलेली नवीन फोर्स शौर्य कमांडोस चर्चेत आली आहे. उंचावरील, डोंगराळ भागातील लढाईसाठी ही फोर्स बनवण्यात आली आहे. सध्या चीन बरोबर सुरु असलेल्या संघर्षात या शौर्य कमांडोजनी आपली ताकद दाखवून दिली आहे. शत्रुजीत सिंह कपूर यांनी ही माहिती दिली. भारत-चीनमध्ये दीर्घकाळापासून सीमावाद आहे. या संघर्षात स्पेशल टीम्स आता महत्वाची भूमिका बजावत आहे. चीन बरोबर पारंपारिक युद्ध नितीने लढण्यात फायदा नाही. हे ओळखूनच ही फोर्स स्थापन करण्यात आली आहे.

“मागच्या काही दिवसात अरुणाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी भारतीय आणि चिनी सैनिक आमने-सामने आले. अजूनही हे सुरुच आहे” असं शत्रुजीत सिंह कपूर राजस्थान अलवर मध्ये आयटीबीपीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. या चकमकींच्यावेळी नव्याने बनवलेल्या शौर्य कमांडोजनची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली असं शत्रुजीत सिंह कपूर म्हणाले. या शौर्य कमांडोजना कुठे तैनात केलय, त्या जागा त्यांनी सांगितल्या नाहीत.

Loading...

शौर्य कमांडोजची खासियत काय?

शौर्य कमांडोज ही आयटीबीपीने काही खास लढायांसाठी तयार केलेली फोर्स आहे. आयटीबीपी अंतर्गतच ही फोर्स बनवण्यात आली आहे. चीनला लागून असणाऱ्या सुरक्षेची जबाबदारी आयटीबीपीकडे आहे. या फोर्सच्या स्थापनेतून भारतीय सैन्य दलाने खास युद्धनिती, युद्ध कौशल्य आत्मसात करण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याच दिसून येतं. भारताच्या उंचावरील प्रदेशातील सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी आयटीबीपीकडे आहे.

किती हजार किलोमीटरची सीमा चीनला लागून?

भारत-चीन युद्धानंतर ऑक्टोंबर 1962 मध्ये आयटीबीपीची स्थापना करण्यात आली. चीनला लागून असलेल्या 3,488 किलोमीटरच्या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भारतातील सर्वात कठीण अशा प्रदेशात आयटीबीपीचे जवान तैनात असतात. खूप थंड, हवा, जिथे पोहोचणं कठीण आहे, जटिल पेट्रोलिंग असलेल्या प्रदेशात आयटीबीपीच्या जवानांची तैनाती होते.

हे कमांडो कशा-कशामध्ये पारंगत?

भारतीय लष्कराच्या घातक प्लाटूनच्या धर्तीवर या नव्या कमांडो फोर्सची बांधणी करण्यात आली आहे. डोंगरावरील लढाईमध्ये ही फोर्स पारंगत आहे. आयटीबीपीच्या तैनात युनिट्सची क्षमता वाढवण हा त्यांचा उद्देश आहे. काही खास परिस्थितीत कमांडो फोर्सची गरज लागते. त्यासाठी ही फोर्स बनवण्यात आली आहे. गिर्यारोहण, आधुनिक शस्त्र वापरण्याची कला, ड्रोन ऑपरेशन्स आणि शस्त्राशिवायच्या लढाईत हे कमांडो पारंगत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us