धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा

तमिळनाडूतील साथनकुलम पोलीस कोठडीत पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात हेड कॉन्स्टेबल रेवतीने नोंदवलेली साक्ष निर्णायक ठरली. धमक्या आणि दबाव यांना न जुमानता तिने सत्य उघडकीस आणलं. तिच्या धैर्यामुळे अमानुष कृत्य करणाऱ्या नऊ आरोपी पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली.

धमक्या-दबावाला न जुमानता पुढे आली.. कोण आहे कॉन्स्टेबल रेवती? जिच्या साक्षीने 9 पोलिसांना झाली फाशीची शिक्षा
हेड कॉन्स्टेबल रेवतीच्या साक्षीमुळे आरोपींना शिक्षा
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 16, 2026 | 9:41 PM

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या तमिळनाडूच्या साथनकुलम इथल्या पोलीस कोठडीतील पिता-पुत्राच्या मृत्यू प्रकरणात मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. सीबीआयच्या तपास अहवालाच्या आधारे न्यायालयाने नऊ पोलिसांनी दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान दुकान उघडल्यामुळे पी. जयराज आणि त्यांचा मुलगा जे. बेनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी त्यांना रात्रभर कोठडीत निर्घृणपणे मारहाण केली, ज्यामुळे पिता-पुत्राचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. याप्रकरणात रेवती नावाच्या एका महिला कॉन्स्टेबलने दाखवलेल्या शौर्यामुळे नऊ पोलिसांना त्यांच्या क्रूरतेची शिक्षा मिळाली. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेली रेवती कोण आहे, जाणून घेऊयात.. नेमकं काय घडलं होतं? ही घटना तुतीकुडी जिल्ह्यातील सत्तनकुलम पोलीस ठाण्यात घडली. घटनेच्या वेळी रेवती तिथेच कार्यरत होती. रात्री आठ वाजताच्या सुमारास ती ड्युटीवर आली. त्या दिवशी पोलीस ठाण्यातील वातावरण तिला नेहमीपेक्षा वेगळंच वाटत होतं. लॉकअपमधून तिला किंकाळ्यांचे आवाज, माफीची याचना करणारे आवाज तिला ऐकू येत होते. “साहेब.. कृपया मला...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us