भारतात फॅनला तीनच पाते असतात, पण अमेरिकेत चार पाते असं का? 99 टक्के लोकांना माहीत नसणार खरं कारण

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यामध्ये तर फॅनची गरज अधिकच भासते. आपल्या प्रत्येकाच्या घरी फॅन असतो, त्या फॅनला तीनच पाते असतात, परंतु अमेरिकेमध्ये मात्र फॅनला चार पाते असतात, असं का? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

भारतात फॅनला तीनच पाते असतात, पण अमेरिकेत चार पाते असं का? 99 टक्के लोकांना माहीत नसणार खरं कारण
fan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 7:50 PM

उन्हाळा सुरू झाला आहे, यंदा तर देशभरात उष्णतेची लाट आल्याचं पहायला मिळत आहे. वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सर्वात उपयोगाची वस्तू म्हणजे फॅन, सध्या फॅनशिवाय घरात एकही मिनिट थांबण्याचा विचार तुम्ही करू शकत नाही. वाढत्या उकाड्यापासून बचावासाठी अनेकांनी आपल्या घरात एसी बसवले आहेत. मात्र ज्यांचं बजेट कमी असतं असेही अनेक लोक आहेत, ज्यांना घरात एसी लावणं परवडत नाही, असे लोक घर थंड ठेवण्यासाठी फॅनचाच वापर करतात. उन्हाळामध्ये तर फॅनचा वापर अधिक होतो, त्यामुळे वीजबिल देखील अधिक येतं. मात्र तुम्ही कधी हे निरीक्षण केलं आहे का? भारतामध्ये जे फॅन असतात त्यांना तीन पाते असतात आणि अमेरिकेत जे फॅन असतात त्यांना चार पाती असतात, तर असं का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वातावरणातील फरक अमेरिकेमध्ये वातावरण हे नेहमी थंड असतं. मात्र भारतामधील वातावरण हे उष्ण आहे. उन्हाळ्यामध्ये तर भारताच्या अनेक भागातील तापमान हे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे देखील जातं. अशा स्थितीमध्ये भारतात खूप फास्ट फिरणाऱ्या फॅनची गरज असते. जर फॅनला तीन पाती असतील तर ते खूप फास्ट फिरू शकतात. मात्र अमेरिकेत असं नसतं, अमेरिकेतील वातावरण हे थंड असतं, उन्हाळ्यामध्ये देखील तापमानात फार काही वाढ होत नाही. त्यामुळे त्यांना कमी आणि नियंत्रीत गतीनं फिरणारा फॅन असेल तरी चालतो, त्यामुळे अमेरिकेत फॅनला चार पाती असतात.

दुसरं म्हणजे अमेरिकेत जवळपास सर्वांच्याच घरात एसी असतात, त्यामुळे तिथे थंडाव्यासाठी एसीचाच वापर होतो. अमेरिकेत फॅन थंडाव्यासाठी वापरत नाहीत, अमेरिकेत घराला थंड करणं हे फॅनच काम नाही. मग आता तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की मग फॅनचं नेमकं काम काय आहे? तर अमेरिकेत फॅनचं काम हे हवेचा दाब नियंत्रीत ठेवणं हे आहे. अमेरिकेतील लोक आपल्या घरात सर्व ठिकाणी हवेची पातळी सारखी राहावी, यासाठी फॅनचा वापर करतात. त्यामुळेच अमेरिकेत फॅनला चार पाते असतात. तर भारतामध्ये मात्र याच्या उलट आहे. भारतामध्ये फॅन अधिक गतीने फिरण्याची गरज असते, त्यासाठी त्याची रचना तशी केलेली असते, भारतामध्ये फॅनला तीनच पाते असतात.

Follow Us