विमानामध्ये 13 नंबरचं सीट का नसतं? 99 टक्के लोकांना माहीत नाही खरं कारण?
अनेकांनी विमानातून प्रवास केला असेल, परंतु तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? अनेक कंपन्यांच्या विमानांना 13 नंबरचं सीटच नसतं? तर असं का? विमानाला 13 नंबरचं सीट का नसतं? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का?

अनेकांनी विमानातून प्रवास केला असेल, काही लोकांनी एकदा -दोनदा विमानातून प्रवास केला असेल तर काही जण सतत विमानातून प्रवास करत असतात. तर अनेकांचं विमानातून आयुष्यात एकदा तरी प्रवास करण्याचं स्वप्न असतं. परंतु विमानाबाबत अशा अनेक रोचक गोष्टी आहेत, ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो. जे लोक विमानातून पहिल्यांदा प्रवास करतात, त्यांना त्याबद्दल फारसं काही माहीत नसतं, त्यांना आपल्या पहिल्या प्रवासाबद्दल मनात एक वेगळा उत्साह असतं, त्यामुळे या गोष्टी त्यांच्या लक्षात येत नाहीत, तसेच जे विमानाने अनेक वेळा प्रवास करतात त्यांना विमान प्रवासाबद्दल फारसं कुतुहल नसतं, त्यामुळे ते देखील फारसं लक्ष देत नाहीत. परंतु तुम्हाला माहित आहे का की अनेक विमानांना 13 नंबरच सीटच नसतं, तुम्ही यानंतर आता जेव्हा कधी विमानाने प्रवास कराल तेव्हा आवर्जून पहा, तुम्ही ज्या विमानाने प्रवास करत आहात? त्या विमानाला 13 नंबरच सीट आहे की नाही?
आता तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का? की विमानाला तेरा नंबरचं सीट का नसतं? त्यामागे नक्की काय कारण असू शकतं? काही तांत्रिक कारण आहे का? तर असं अजिबात नाही. विमानाला 13 नंबरचं सीट नसल्यामागे कोणतंही तांत्रिक कारण नाहीये, तर यामागे निव्वळ एक अंधश्रद्धा आहे. जशी भारतामध्ये आपल्याला अनेक बाबातींमध्ये अंधश्रद्धा दिसते, तशीच अंधश्रद्धा इतरही अनेक देशांमध्ये आहे. काही देशांमध्ये 13 नंबरचा आकडा हा अतिशय अशुभ मानला जातो.
याच कारणांमुळे अनेक कंपनीच्या विमानाला तेरा नंबरच सीटच नसतं. अनेक देशातील लोक तेरा नंबरच्या सीटवर बसणं टाळतात, त्यामुळे कंपनी देखील विमानामध्ये तेरा नंबरच सीट ठेवत नाही. कळस म्हणजे तुम्ही जेव्हा परदेशात जातात तर अनेक ठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये तेरा नंबरची रूम देखील नसते, यामुळे काहीतरी वाईट घडू शकतं असा अनेकांचा गैरसमज आहे, त्यामुळे अनेक जण तेरा नंबरच्या रूमध्ये राहणं देखील टाळतात.