US Iran Ceasefire : युद्धविरामाच्या काही तासांमध्येच नेतन्याहू यांची हादरवणारी घोषणा, जगभरात पुन्हा मोठी खळबळ, पाकिस्तानला धक्का

मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला म्हणून जगाने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र त्यानंतर आता इस्त्रायलच्या नव्या घोषणेमुळे जगाचं टेन्शन वढालं आहे.

US Iran Ceasefire : युद्धविरामाच्या काही तासांमध्येच नेतन्याहू यांची हादरवणारी घोषणा, जगभरात पुन्हा मोठी खळबळ, पाकिस्तानला धक्का
benjamin netanyahu
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 08, 2026 | 3:59 PM

इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं. तब्बल 38 दिवस हे युद्ध चाललं. या युद्धामध्ये तीनही देशांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे इराणने केलेल्या मिसाईल हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं देखील मोठं नुकसान झालं आहे. एवढंच नाही तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद केला होता, त्यामुळे संपूर्ण जगभरात मोठी इंधन टंचाई निर्माण झाली होती. याचा भारताला देखील मोठा फटका बसला. व्यावसायिक गॅस सीलिंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल चालकांना आपलं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली. दरम्यान इराण आणि अमेरिकेमध्ये लवकरात लवकर युद्धविराम व्हावा अशी संपूर्ण जगाची इच्छा होती. अखेर तो दिवस आला आहे. पाकिस्तानला मध्यस्थी करण्यात यश मिळालं असून, दोन आठवड्यासाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र एकीकडे इराण, अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये युद्धविराम झाला असतानाच आता दुसरीकडे पुन्हा एकदा इस्त्रायलने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव कायम राहणार आहे. हे सीजफायर लेबनॉनसाठी लागू नाही, जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार असल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा दावा देखील फेटाळून लावला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, लेबनॉनचा देखील या युद्धविरामामध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे आता इस्त्रायलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, हा युद्धविराम फक्त इराणशी संबंधित आहे, मात्र लेबनॉनवर कारवाई सुरूच ठेवणार आहोत.

दुसरीकडे मात्र इस्त्रायलचे राष्ट्रपती बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणसोबतच्या या युद्धविरामाचं समर्थन केलं आहे, तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचं देखील समर्थन केलं आहे. दोन आठवड्याचा युद्धविराम झाला आहे. त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटीप्रमाणे आता इराणला तातडीनं जहाजांसाठी स्ट्रीट ऑफ होर्मूज ओपन करावा लागेल असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.

 

Follow Us