रेल्वेत महिलेचं शीर, सगळीकडे दुर्गंधी, लाल सूटकेस हत्याकांडांचा हादरवून टाकरणारा सस्पेन्स, पोलीसही थक्क!

हत्या करण्यात आलेली महिला नेमकी कोण? याचा शोध पोलीस घेत होते. या शोधामध्ये पोलीस थेट तामिळाडूपर्यंत पोहोचले. त्यांनी चेन्नई सेंट्रल स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अनेक तासांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एक पुरुष आणि महिला लाल सूटकेस घेऊन तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसले.

रेल्वेत महिलेचं शीर, सगळीकडे दुर्गंधी, लाल सूटकेस हत्याकांडांचा हादरवून टाकरणारा सस्पेन्स, पोलीसही थक्क!
tamil nadu railway red suitcase case
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 30, 2026 | 7:31 PM

Tamilnadu Railway Red Suitcase Death Case : रेल्वेच्या डब्यात पडलेला एक लाल रंगाचा सूटकेस… त्यातून येणारी प्रचंड दुर्गंधी… आणि तो उघडल्यानंतर समोर आलं भयंकर दृश्य. 5 ऑगस्ट रोजी आग्रा कॅन्ट स्थानकावर घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. सूटकेसमध्ये एका महिलेचं छाटलेलं शीर आणि शरीराचे काही तुकडे आढळल्यानंतर पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. अखेर तब्बल 24 दिवसांच्या तपासानंतर या निर्घृण हत्येचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे.

नेमकं काय घडलं होतं?

5 ऑगस्ट रोजी तमिळनाडू एक्स्प्रेस आग्रा कॅन्ट स्थानकावर पोहोचली. यावेळी एका अनारक्षित डब्यात लाल सूटकेसमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. तक्रार प्राप्त होताच जीआरपीने सूटकेस उघडली. या सुटकेसमध्ये त्यांना महिलेचं छाटलेलं शीर आणि शरीराचे तुकडे दिसले. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. मृतदेहाची ओळख पटवणं आणि ही सूटकेस ट्रेनमध्ये नेमका कोणी ठेवली, याचा शोध घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान निर्माण झालं होतं.

पोलिसांनी आरोपींना नेमकं कसं शोधलं?

दरम्यान, हत्या करण्यात आलेली महिला नेमकी कोण? याचा शोध पोलीस घेत होते. या शोधामध्ये पोलीस थेट तामिळाडूपर्यंत पोहोचले. त्यांनी चेन्नई सेंट्रल स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अनेक तासांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एक पुरुष आणि महिला लाल सूटकेस घेऊन तमिळनाडू एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसले.
पोलिसांनी अखेर आरोपींना शोधून काढले. या प्रकरणात एकूण दोन आरोपी असल्याचे सोर आले आहे. यातील पाहिल्या आरोपीचे नावमाणिक उद्दीन लस्कर असून तो आसाममधील आहे. तर दुसरी आरोपी ओडिशातील असून तिचे नाव भगवती मांझी असल्याचे समोर आले. चेन्नईजवळील गुडुवांचेरी येथील त्यांच्या भाड्याच्या घराची झडती घेतली असता बिर्याणी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यात मानवी शरीराचे आणखी काही तुकडे सापडले आहेत.

हत्ये झालेल्या महिलेचे नाव काय?

फॉरेन्सिक तपासातून मृत महिलेची ओळख पटली असून तिचे नाव हयाथुन निशा असे आहे. त्या गुडुवांचेरी परिसरात राहत होत्या आणि एका खासगी कंपनीत काम करत होत्या. काही दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या आणि स्थानिक पोलीस ठाण्यात त्यांची हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी दाम्पत्याचा शोध घेत पोलिसांनी अनेक राज्यांचा प्रवास केला. या हत्येमागचं नेमकं कारण काय? हयाथुन निशा यांची हत्या इतक्या क्रूर पद्धतीने का करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरं अद्याप तपासातून समोर आलेली नाहीत. पोलीस या प्रकरणाचा तपास करतआहेत.

Follow Us