आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 : योग हा तत्त्वज्ञान किंवा धर्म नव्हे तर अंतर्गत कल्याणाचे विज्ञान – सद्गुरू

Sadhguru on Yoga : ईशा फाऊंडेशनने आज देशाच्या विविध भागात योग सत्रांचे आयोजन करण्यात आळे होते. आजच्या एका कार्यक्रमात सद्गुरूंनी योगाचे महत्त्व सांगितले.

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 : योग हा तत्त्वज्ञान किंवा धर्म नव्हे तर अंतर्गत कल्याणाचे विज्ञान - सद्गुरू
Sadguru on international Yoga day
Image Credit source: X
| Updated on: Jun 21, 2026 | 3:12 PM

आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त ईशा फाऊंडेशनने कोयंबतूर येथील आदियोगी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) जवानांसाठी तसेच बेंगळुरूतील सद्गुरू सन्निधी येथे NCC कॅडेट्स आणि सीमा सुरक्षा दल (BSF) जवानांसाठी विशेष योग सत्रांचे आयोजन केले. याशिवाय, देशभरात सुमारे 1,000 मोफत योग आणि ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे कॉर्पोरेट क्षेत्र, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था, सरकारी विभाग, संरक्षण दल आणि विविध समुदायांतील अंदाजे 50,000 सहभागींपर्यंत योगाचा संदेश पोहोचवण्यात आला.

योग हे अंतर्गत कल्याणासाठीचे विज्ञान – सद्गुरू

यावेळी बोलताना सद्गुरू म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय योग दिन हा आपल्याला आठवण करून देतो की आपण ज्याला योग म्हणतो, तो कोणतेही तत्त्वज्ञान, विचारधारा, श्रद्धा प्रणाली किंवा धर्म नाही. योग हे अंतर्गत कल्याणासाठीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. तुमचा धर्म, वंश, जात, पंथ किंवा लिंग कोणतेही असो, योगाच्या या पद्धती तुम्हाला सर्वोत्तम अस्तित्वाकडे घेऊन जातात. त्या शरीर, मन, भावना, बुद्धिमत्ता आणि ऊर्जा यांची सर्वोच्च क्षमता विकसित करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रत्येक माणसामध्ये दडलेल्या असामान्य प्रतिभेला आणि सृजनशीलतेला जागृत करण्याची क्षमता योगामध्ये आहे.

ईशा फाउंडेशनबद्दल माहिती

सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ईशा फाउंडेशन गेली 30 हून अधिक वर्षे योगाचे प्राचीन विज्ञान त्याच्या शुद्ध स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवत आहे. जगभरातील 400 हून अधिक केंद्रांमध्ये 1.7 कोटींहून अधिक स्वयंसेवकांच्या सहकार्याने कार्यरत असलेली ही संस्था मानवी कल्याणासाठी समर्पित आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक अशा जीवनाच्या सर्व पैलूंना स्पर्श करणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे ईशा फाउंडेशन कार्य करते. योग आणि ध्यानाच्या प्रभावी कार्यक्रमांच्या माध्यमातून ईशा अंतर्गत आनंद, आरोग्य आणि समाधानाकडे नेणारी साधने उपलब्ध करून देते. त्यामुळे जगभरातील लाखो लोक अधिक निरोगी, आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगत आहेत.

दरम्यान, आज ईशा फाउंडेशनच्या वतीने देशातील विविध भागात योग सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारो लोकांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याबरोबर सरकारकडूनही वेगवेगळ्या ठिकाणी योगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Follow Us