Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून…

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशभरात साजरी होत आहे. यंदाची जयंती समता आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. या जयंती निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 15 विचार आपण पाहणार आहोत.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेबांचे हे 15 विचार वाचताच तुमचं अख्खं आयुष्य हमखास बदलेल, 5 वा विचार वाचून...
Dr. Babasaheb Ambedkar
| Updated on: Apr 13, 2026 | 8:33 PM

भारतीय संविधानचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू (Mhow) या लष्करी छावणीच्या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ ब्रिटीश काळात सैन्यात सुभेदार होते. त्यांची यंदा 135 वी जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भव्य ड्रोन शो,सांस्कृतिक कार्यक्रम,रॅली आणि अभिवादन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ही जयंती समता आणि ज्ञानाचा उत्सव म्हणून साजरी केली जात आहे.या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे महत्वाचे विचार आपण जाणून घेणार आहोत. हे विचार वाचून तुमचे आयुष्य बदलेल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार….

१ ) बाबासाहेब म्हणतात, आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?

२ ) “नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या ताकदीवर विश्वास ठेवा.” आपण जे करतोय किंवा आपल्यात जी ताकद आहे ती ओळखायला शिका. नशिबावर अवलंबून निर्भर राहू नका.

३ ) उगवत्या सुर्याला नमस्कार करताना मावळत्या चंद्राला विसरु नका.

४) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल.

५)जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही.जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो.

६) जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका, या जगात काहीतरी करुन दाखवायचे आहे. अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा.जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

७) वाणीचा आणि भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.

८) मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दवडण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

९ ) माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायला हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

१०) शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे. आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.

११) सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.

१२ ) ‘जे इतिहास विसरतात, ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत.इतिहास कधी विसारायचा नसतो. त्यातून अनेक गोष्टी शिकायच्या असतात. ज्या चुका इतिहासात झाल्या त्या पुन्हा होऊ द्यायच्या नसतात. त्यावेळीच तुम्ही इतिहास घडवू शकता.

१३) हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तुम्हाला तुमचे हक्क मिळवायचे असतील संघर्ष करायला शिका. त्यानंतरच तुम्हाला तुमचे हक्क मिळतील.

१४) बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे. आपण नेहमी काहीतरी शिकत राहिले पाहिजे. आपले ज्ञान वाढविण्यावर भर दिला पाहिजे.

१५) अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभीमानी आणि स्वावलंबी बनले पाहिजे.

 

 

Follow Us