आठवड्याभरात तीन दिग्गज घरी गेले, क्रिकेट ते राजकारण, सत्तेची चक्र वेगानं फिरतायत? वाचा सविस्तर

| Updated on: Sep 19, 2021 | 7:14 AM

हा आठवडा देशासाठी ऐतिहासिक आहे. कारण दोन राज्यातले प्रमुख सत्ताधारी बदलण्यात आलेत तर क्रिकेटच्या वंडर बॉयला टी 20 चं कॅप्टन पद सोडायला लागलंय. म्हणजेच दोन कॅप्टन आणि एक मुख्यमंत्री.

आठवड्याभरात तीन दिग्गज घरी गेले, क्रिकेट ते राजकारण, सत्तेची चक्र वेगानं फिरतायत? वाचा सविस्तर
विजय रुपाणी, विराट कोहली आणि अमरिंदर सिंग
Follow us on

मुंबई : हा आठवडा देशासाठी ऐतिहासिक आहे. कारण दोन राज्यातले प्रमुख सत्ताधारी बदलण्यात आलेत तर क्रिकेटच्या वंडर बॉयला टी 20 चं कॅप्टन पद सोडायला लागलंय. म्हणजेच दोन कॅप्टन आणि एक मुख्यमंत्री. आधी गुजरातमध्ये भाजपानं मुख्यमंत्री बदलला नंतर पूर्ण मंत्रीमंडळच नवं निर्माण केलं. देश त्या राजकीय धक्क्यातून सावरतोय तोच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं टी 20 चं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. इथेही फक्त तोच बदलला जातोय असं नाही तर कोचही बदलतोय म्हणजे त्याच्यासोबतचा स्टाफही बदलला जाऊ शकतो. हे दोन्ही धक्के कमी होते की काय, पंजाबमध्ये मात्र अचानक काँग्रेसमध्ये भूकंप झाला आणि शेवटी कॅप्टन अमरींदरसिंह यांना राजीनामा द्यावाच लागला. बघता बघता ह्या आठवड्यात तीन दिग्गज व्यक्ती सत्तेच्या सारीपाटावरून दूर सारले गेलेत.

रुपाणींना सुरुवात केली…!

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेले रुपाणी राज्यपालांच्या भेटीला गेले. सोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि इतरही एक दोन नेते होते. सगळ्यांना वाटलं आता मंत्रीमंडळ विस्तार होणार. मंत्रीपदासाठी तेवढाच वेळ काहींनी मुंडावळ्याही बांधल्या. काही वेळानंतर रुपाणी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांसमोर आले आणि त्यांनी बाँबगोळाच टाकला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं घोषीत केलं. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे रुपाणीच नाही तर त्यांचंही मंत्रीमंडळही आपोआपच घरी गेलं. त्यादिवशी 11 सप्टेबर म्हणजेच शनिवार होता.

रुपाणींच्या पावलावर धोनी

एखादा राज्यातला मुख्यमंत्री असा अचानक बदलला गेला तर राजकीय बंड, रुसवे, फुगवे प्रसंगी पक्ष फुटीचं संकट उभं राहातं. पण भाजपानं ते एका पाठोपाठ काही राज्यात यशस्वीपणे करुन दाखवलं. त्याला कारण अर्थातच मोदींचं सक्षम नेतृत्व कारणीभूत आहे. पण टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं ज्यावेळेस टी 20 चं कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली त्यावेळेस मात्र काहीसा धक्का बसला. विराटनं वर्कलोडचं कारण दिलं पण त्याचं कारण पटण्यासारखं नाही. एवढचा वर्कलोड आहे तर मग तो आयपीएलचं कर्णधारपद का सोडत नाही असा सवाल विचारला जातोय. वास्तव असंय की विराट आणि बीसीसीआयमध्ये काही गोष्टींवर मतभेद आहेत. त्यामुळेच विराटला एका फॉरमॅटचं कर्णधारपद सोडावं लागलंय. विराटचे रवी भाई म्हणजेच रवी शास्त्री यांचाही कार्यकाळ पूर्ण होतोय त्यामुळे टीम इंडियाला नवा कोच मिळण्याची चिन्हं आहे. जसं बदलतं राजकारण मजेशीर आहे तसाच क्रिकेटचा हा बदलही पहाण्यासारखा आहे.

पंजाबमध्ये काँग्रेस घायाळ

सहा महिन्यात भाजपानं 5 मुख्यमंत्री बदलले पण कुठे उँ की चूँ कुणी केलं नाही. कारण भाजपचं मजबूत दिल्ली नेतृत्व. काँग्रेसचं मात्रं तसं नाही. कॅप्टन अमरींदरसिंह यांच्याविरोधात बंड केलं गेलं. त्याला भाजपातून अलिकडेच आलेल्या सिद्धूनं हवा दिली. बघता बघता वनवा पेटला. शेवटी कॅप्टननी राजीनामा दिला. पण सोबतच त्यात
काँग्रेस होरपळेल याचीही तजवीज केली. कारण कॅप्टन अमरींदरसिंह यांनी सिद्धूवर पाक कनेक्शनचे आरोप केले. सोबत पुढं काय करायचं याचा पर्याय असल्याचही जाहीर केलं. म्हणजेच उघड उघड बंडाची भाषा केली. शेवटी पंजाबमध्ये अजून नाटकाचे अंक उलगडणं बाकी आहे. ते कुठल्या वळणार तिथलं नाटक जाईल हे पहाणं औत्सुक्याचं आहे.

हे ही वाचा :

क्रिकेट असो की राजकारण… ‘कॅप्टन’विरोधात सिद्धूंचं कायम बंड; सेकंड इनिंगमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग ‘क्लीन बोल्ड’

TMC मध्ये आल्याने बाबुल सुप्रियोंवर ममता बनर्जी खुश, पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता