TMC मध्ये आल्याने बाबुल सुप्रियोंवर ममता बनर्जी खुश, पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता

तृणमूल काँग्रेसचे नेत्या आणि राज्यसभेच्या माजी खासदार अर्पिता घोष यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्यसभेतील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या रिकाम्या झालेल्या जागेवर आता TMCकडून बाबुल सुप्रियो यांना संधी दिली जाऊ शकते.

TMC मध्ये आल्याने बाबुल सुप्रियोंवर ममता बनर्जी खुश, पक्षाकडून राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता
Babul Supriyo
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 5:45 PM

कोलकाता: ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस TMC आता नवीन डाव खेळण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी ममतांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेत्या आणि राज्यसभेच्या माजी खासदार अर्पिता घोष यांनी काहीच दिवसांपूर्वी राज्यसभेतील आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या रिकाम्या झालेल्या जागेवर आता TMCकडून बाबुल सुप्रियो यांना संधी दिली जाऊ शकते.

तृणमूल काँग्रेसमध्ये बाबुल सुप्रियोंचा प्रवेश

भाजपचं कमळ सोडून ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले. शनिवारी त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्याचं जाहिर केलं. काहींच दिवसांपूर्वी त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचं जाहिर केलं होतं. विशेष गोष्ट म्हणजे, बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जींचे कट्टर विरोधक राहिले आहेत. जेव्हा त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय जाहिर केला होता, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, ते कुठल्याही पक्षात जाणार नाहीत.

16 सप्टेंबरला अर्पिता यांचा राजीनामा

मात्र आता TMC मध्ये आल्यामुळे ममता बॅनर्जी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. 16 सप्टेंबरला तृणमूलच्या खासदार अर्पिता घोष यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. याआधी त्यांनी पश्चिम बंगालमधील बलूरघाट मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ममतांनी अर्पिता यांना निराश न करता, राज्यसभेवर पाठवलं. 4 ऑक्टोबरला 7 राज्यसभेच्या जागांवर पोटनिवडणुका होणार आहे, यात तामिळनाडूमध्ये 2 तर महाराष्ट्र, बंगाल, आसाम, पॉंडेचेरी आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी एकाच जागेचा समावेश आहे.

मंत्रिपद गेल्यानंतर बाबुल यांचा राजीनामा

काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने मंत्रिमंडळात फेरबदल केले. या फेरबदलांदरम्यान बाबुल सुप्रिया यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. यामुळे नाराज झालेला सुप्रिया यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र असं असलं तरी त्यांनी अधिकृतरित्या भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिला नाही. बाबुल सुप्रियो तृणमूलमध्ये आल्यानंतर आता तृणमूलने भाजपवर वार करण्यास सुरुवात केली आहे. TMC नेते कुणाल घोष म्हणाले की, ‘ही फक्त सुरुवात आहे, भाजपचे अनेक नाराज नेते आमच्या संपर्कात आहेत, ते भाजपच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, त्यातील बाबुल सुप्रिया तृणमूलमध्ये आले आहेत, आता अजूनही नेते टप्याटप्याने आमच्या पक्षात येतील, तुम्ही थांबा आणि पाहात राहा’

हेही वाचा:

Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका

Amrindar Singh Resigns : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा अखेर राजीनामा! आता पुढचं पाऊल काय?

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.