Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनी राजकीच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

Breaking : आधी भाजपात गेले, नंतर संन्यास घेतो म्हणाले आणि आता थेट ममता दिदीच्याच पक्षात, भाजपला झटका
माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले भाजप खासदार यांनी राजकीच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता भाजपला रामराम ठोकत त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. तृणमूल काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ‘माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो आज राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूल परिवारात सहभागी झाले’, असं ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. (Former Union Minister and MP Babul Supriyo joins Trinamool Congress)

जुलैच्या शेवटी राजकीय संन्यासाबाबत भाष्य

बाबुल सुप्रियो यांनी दोन महिन्यांपूर्वी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली होती. तसेच त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मोदी सरकारच्या विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा होती.

फेसबुक पोस्टद्वारे भावना प्रकट

बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवरून राजकीय संन्यासाबाबत भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या होत्या. सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. अलविदा… मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआयएम या पैकी मला कुणीच बोलावलं नाही. मी कुठेच जात नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय पक्षाची गरजच नाही, असं सुप्रियो यांनी म्हटलं होतं. मात्र, आता त्यांनी थेट तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

पक्षासोबत मतभेद होते

गेल्या काही दिवसापासून बाबुल सुप्रियो भाजपमध्ये फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात होते. ते काही तरी मोठा निर्णय घेतील असं बोललं जात होतं. त्यांनी फेसबुक पोस्टवरून त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. पक्षासोबत आपले काही मतभेद होते. निवडणुकीपूर्वीच या गोष्टी सर्वांच्या समोर उघड झाल्या होत्या. पराभवाची मीही जबाबदारी घेत आहे. परंतु, त्याला दुसरे नेतेही जबाबदार आहेत, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

इतर बातम्या :

रोहित पवारांचा माजी मंत्री राम शिंदेंना पुन्हा झटका? शिंदेंच्या खंद्या समर्थकाची राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज? खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Former Union Minister and MP Babul Supriyo joins Trinamool Congress

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI