मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज? खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज? खासदार संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 2:17 PM

मुंबई : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत भावी सहकारी असं वक्तव्य केलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत. (Discussion that NCP is upset over CM Uddhav Thackeray’s statement about the alliance with BJP)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ गुगलींने सगळेच अवाक् झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीत पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये नापसंती असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा काही निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

खुद्द शरद पवार यांची नाराजी?

महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादेत केलेल्या विधानावर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीच नापसंती व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. पवार यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे नापसंती व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल असताना अशा वक्तव्यांची गरज काय? असा सवाल पवार यांनी केल्याचं सूत्रांकडून कळत आहे.

मुख्यमंत्री काल औरंगाबादमध्ये काय म्हणाले होते? 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला.

देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील एकाच गाडीत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचा पुढचा अंक नंदुरबारमध्ये पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. कारण आज सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले.

इतर बातम्या :

उद्धवजींना ‘रिअलाईज’ झाल्यामुळेच आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत : देवेंद्र फडणवीस

येणारा काळच काय ते ठरवेल, मुख्यमंत्र्यांचं एकामागोमाग एक सूचक विधान, तर्कवितर्कांना जोरदार उधाण

Discussion that NCP is upset over CM Uddhav Thackeray’s statement about the alliance with BJP

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.