AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री भागवत कराड सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला, मुलाने विचारलं, मास्क काढू का? मोदी म्हणाले, आपल्यासोबत दोन दोन डॉक्टर!

डॉ. कराड यांचा मुलगा. हर्षवर्धन याने फोटो काढण्यापूर्वी 'मास्क काढू का?' असे विचारले. त्यावेळी मोदी म्हणाले, 'आपल्यासोबत दोन-दोन डॉक्टर (डॉ. भागवत कराड आणि डॉ. अंजली) आहेत. त्यामुळे तुम्ही मास्क काढायला हरकत नाही.

मंत्री भागवत कराड सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीला, मुलाने विचारलं, मास्क काढू  का? मोदी म्हणाले, आपल्यासोबत दोन दोन डॉक्टर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत (डावीकडून) वरूण, डॉ.अंजली. डॉ. भागवत कराड, हर्षवर्दन, रश्मी व चिमुकली अविशा कराड
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 3:10 PM
Share

औरंगाबाद: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली. जन आशीर्वाद यात्रेत मराठवाड्यातील माता-भगिनीनी दिलेल्या राख्या, सोनपेठ तालुक्यातील निळागावचे शेतकरी दत्तराव सोळंके (Dattarao Solanke) यांनी दिलेला फेटा आणि लाभार्थींनी दिलेले आभारपत्र कराड यांनी मोदींना दिले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी डॉ. कराड यांच्या कुटुंबियांची आत्मीयतेने चौकशी केली. कराड हे डॉक्टर असल्याने या भेटीत आम्ही बिनधास्त आहोत, असा विनोद केला.

मास्क काढू का विचारले असता…

दिल्लीतच्या या भेटीत डॉ. कराड यांचा मुलगा. हर्षवर्धन याने फोटो काढण्यापूर्वी ‘मास्क काढू का?’ असे विचारले. त्यावेळी मोदी म्हणाले, ‘आपल्यासोबत दोन-दोन डॉक्टर (डॉ. भागवत कराड आणि डॉ. अंजली) आहेत. त्यामुळे तुम्ही मास्क काढायला हरकत नाही. ‘

छोट्या अविशाला मोदींकडून चॉकलेट

मोदींच्या या भेटीत डॉ. कराड यांच्यासोबत पत्नी डॉ. अंजली, मुलगे हर्षवर्धन, वरुण, सून रश्मी आणि नात अविशा हेदेखील होते. मोदींनी अविशासोबत मराठीतून संवाद साधत तिला चॉकलेटही दिले. तसेच कराड कुटुंबातील प्रत्येकाशी बोलून ते काय करतात, याची सविस्तर माहिती घेतली. कराडांचे सुपुत्र हर्षवर्धन यांना मोदींनी तुम्हीही डॉक्टर आहात का, असे विचारले. तेव्हा त्यांनी ‘मी फार्मास्युटिकल व्यवसायात आहे’ अशी माहिती दिली.

मोदींना दिली हिमरू शालीची भेट

डॉ. भागवत कराड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगाबादची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख असलेली हिमरू शाल दिली. ती पाहून मोदींनी ‘ही काश्मीरमधील शाल आहे का?’ असे विचारले. तेव्हा डॉ. कराड यांनी आपल्या औरंगाबादच्या प्रसिद्ध हिमरू शालीची माहिती त्यांना दिली. ही शाल अनेक वर्षांपासून औरंगाबादेत तयार होते. अजिंठा, वेरुळ लेण्यांप्रमाणे तिचेही महत्त्व आहे. तसेच या शालीची निर्मितीप्रक्रिया वेगळी आहे, ही सर्व माहिती कराड यांनी मोदींना दिली.

डॉ. कराड मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन

डॉ. कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील असून त्यांनी औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. पुढे उच्च शिक्षण घेत ते मराठवाड्यातील पहिले बालरोग सर्जन बनले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी 1996 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आलेले कराड हे शहराचे दोन वेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाड्यात भाजप वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. शेतकरी पुत्र असलेल्या डॉ. कराड यांचा नगरसेवक ते केंद्रातील मंत्री असा राजकीय प्रवास झाला. त्यांना मंत्रिपद देऊन भाजपने एकप्रकारे राज्यातील ओबीसींना मोदी सरकारमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे. (Union Minister Dr. Bhagwat Karad from Maharashtra meets Prime Minister Narendra Modi with family at Delhi after BJP Jan Ashirwad Yatra)

इतर बातम्या:

चंद्रकांत पाटलांना बदलण्याची चर्चा का होतेय?; खरंच बदललं जाणार का?

भागवत कराड आणि देवेंद्र फडणवीस भेटीत काय घडलं?, हास्यविनोद ते गंभीर चर्चा; ‘हे’ चार फोटो काय सांगतात?

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.