फक्त 10 कोटींचं बजेट, कमाई 200 कोटी पार; कथा इतकी दमदार की तुम्हीही म्हणाल ‘वाह’!

कथा दमदार असली की कोणताही प्रमोशन न करताही चित्रपटाला ब्लॉकबस्टर करता येऊ शकतं, ही गोष्ट या चित्रपटाने सिद्ध केली आहे. 'धुरंधर : द रिव्हेंज' आणि 'भूत बंगला' या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला असतानाही या कमी बजेटच्या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

| Updated on: Apr 22, 2026 | 3:45 PM
1 / 9
मल्याळम चित्रपट नेहमीच त्यांच्या दमदार कथानकासाठी ओळखले जातात. सध्या बॉक्स ऑफिसवर अशाच एका दमदार कथेचा चित्रपट धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. 'वाझा 2: बायोपिक ऑफ अ बिलियन बॉइज' असं या चित्रपटाचं नाव आहे.

2 / 9
विशेष म्हणजे, जिथे एखाद्या चित्रपटाला 100 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते, तिथे या चित्रपटाने फक्त 20 दिवसांत जगभरात 200 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवत सर्वांनाच चकीत केलं आहे. या चित्रपटाने मॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक जुने रेकॉर्ड्स मोडले आहेत.

3 / 9
'वाझा 2'च्या यशात सर्वांत मोठा वाटा हा 'माऊथ पब्लिसिटी'चा आहे. म्हणजेच लोकांकडून या चित्रपटाचं प्रचंड कौतुक होत आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची पकड मजबूत आहे. आकड्यांबद्दल बोलायचं झाल्या, 20 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या मंगळवारी 'वाझा 2'ने जवळपास 1.90 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

4 / 9
'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर आता याचं नेट कलेक्शन जवळपास 111.10 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जर या चित्रपटाने 125 कोटींचा टप्पा पार केला तर 'मंजुमेल बॉइज'सारख्या मोठ्या चित्रपटांच्या यादीत त्याचा समावेश होईल.

5 / 9
या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या 'एल 2: एम्पुरान' या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. 'एल 2: एम्पुरान'चं लाइफटाइम कलेक्शन 106.77 कोटी रुपये होतं. आता मोहनलाल यांच्या 'थुडारम' या दुसऱ्या चित्रपटावर याची नजर आहे, ज्याने 122 कोटी रुपये कमावले होते. असं झाल्यास हा तिसरा सर्वांत मोठा मल्याळम चित्रपट ठरेल.

6 / 9
या चित्रपटाला फक्त भारतातच नाही तर परदेशातही चांगला प्रतिसाद मिळतोय. गेल्या 20 दिवसांत भारतातील ग्रॉस कलेक्शनचा आकडा 128.47 कोटींवर पोहोचला आहे. तर परदेशात या चित्रपटाने आतापर्यंत 83.55 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे 'वाझ 2'चं वर्ल्डवाइड ग्रॉस कलेक्शन 212.02 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

7 / 9
विपिन दास यांनी लिहिलेल्या कथेचा या चित्रपटाच्या यशात मोठा वाटा आहे. हसीर, अॅलन, अजिन आणि विनायक या चार मित्रांभोवती याची कथा फिरते. समाज आणि कुटुंबाच्या नजरेत या चौघांना 'लुजर्स' म्हणजेच अपयशी मानलं जातं. जेव्हा त्यांना त्यांच्या या प्रतिमेची जाणीव होते, तेव्हा ते आत्मशोधाच्या प्रवासाला सुरुवात करतात. हा प्रवास भावनिक आणि मनोरंजक असल्याने तरुण पिढीला तो आपलासा वाटतोय.

8 / 9
'वाझा : बायोपिक ऑफ अ बिलियन बॉइज' हा या चित्रपटाचा पहिला भाग 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने 38 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि त्याचं बजेट फक्त 4 कोटी रुपये होतं.

9 / 9
आता दुसऱ्या भागाचं बजेटसुद्धा फक्त 10 कोटी रुपये आहे. यानंतर आता तिसरा भागसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 मल्याळम चित्रपटांच्या यादीत हा चौथ्या क्रमाकांवर आहे.

Follow Us