Gold Silver Price : धाड… धाड… कोसळले सोने, चांदीत 4 हजारांची घसरण, थेट सोन्याचा भाव..
Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी चढउतार बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा सोने घसरल्याचे बघायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या भावात चढउतार बघायला मिळाली. त्यातच सोने महाग होण्याा अंदाज असतानाच सोने स्वस्त झाल्याचे बघायला मिळतंय.
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली. 22 ऑक्टोबर 2026 रोजी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. MCX वर चांदीच्या किंमतीत 4,550 रुपयांची घसरण झाली असून, ती आता प्रति किलो 204,618 रुपयांवर व्यवहार करत आहे.
सोन्याच्या किंमतीत 1,558 रुपयांची घट झाली. प्रति 10 ग्रॅम 144,521 रुपयांवर व्यवहार करत आहे. चांदीच्या किंमतीत 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
22 ऑक्टोबर 2026 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 14, 607 रुपये इतका आहे. दिल्लीमध्ये हा भाव 14,622 रुपये आहे तर वडोदरा आणि अहमदाबादमध्ये तो 14,612 रुपये इतका आहे.
22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 13,389 रुपये असून दिल्लीमध्ये तो 13,404 रुपये नोंदवला गेला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या भावातही शहरांनुसार थोडा फरक दिसून येतो. सतत सोन्याच्या भावात घसरण होतंय.