57 वर्षीय अभिनेत्याचं 25 वर्षांच्या मुलीवर प्रेम, 27 वर्षांच्या मुलाची बनणार होती सावत्र आई; चाहत्यांकडून तुफान ट्रोल

या अभिनेत्याच्या प्रेमप्रकरणाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तो 24 वर्षीय तरुणीला डेट करत होता. आश्चर्याची बाब म्हणजे त्यावेळी त्याच्या मुलाचं वय 27 होतं. या नात्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

| Updated on: Apr 21, 2026 | 9:44 AM
1 / 6
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता बबलू पृथ्वीराजचं खासगी आयुष्य कोणत्याही ड्रामापेक्षा कमी नाही. काही काळापूर्वी त्याच्या लव्ह लाइफ आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या चर्चांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. वयाच्या 57 व्या वर्षी त्याचे एका 24 वर्षीय महिलेशी संबंध होते. त्यानंतर त्यांनी लग्नाची घोषणा करण्याचा निर्णय घेताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता बबलू पृथ्वीराजचं खासगी आयुष्य कोणत्याही ड्रामापेक्षा कमी नाही. काही काळापूर्वी त्याच्या लव्ह लाइफ आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या चर्चांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. वयाच्या 57 व्या वर्षी त्याचे एका 24 वर्षीय महिलेशी संबंध होते. त्यानंतर त्यांनी लग्नाची घोषणा करण्याचा निर्णय घेताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

2 / 6

बबलूचं पहिलं लग्न 1994 मध्ये बीनासोबत झालं होतं. परंतु 28 वर्षांच्या संसारानंतर 2022 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर बबलूच्या आयुष्यात शीतल आली. वयातील फरकामुळे हे नातं चर्चेत आलं होतं. जेव्हा बबलूने सोशल मीडियावर शीतलसोबतचं नातं जाहीर केलं, तेव्हा अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत आश्चर्य व्यक्त केलं होतं.

3 / 6

बबलूने नातं जाहीर केलं तेव्हा तो 57 वर्षांचा आणि शीतल फक्त 24 वर्षांची होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बबलूचा मुलगा अहेद त्यावेळी 27 वर्षांचा होता. लोकांनी यावरून त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं.

4 / 6

त्यावेळी बबलूने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत म्हटलं होतं, "जर शीतलच्या कुटुंबीयांना या लग्नाबद्दल काही अडचणी नसतील, तर जगाने काळजी करण्याची गरज नाही. ती वयाने लहान असली तरी तिची बुद्धिमत्ता प्रौढ स्त्रियांइतकीच आहे."

5 / 6

बबलू आणि शीतल हे त्यांच्या फिटनेसच्या आवडीमुळे एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. सोशल मीडियावरून त्यांनी फोटो हटवताच चाहत्यांमध्ये ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर 2024 मध्ये तिने सुमेश नावाच्या व्यक्तीशी लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात केली. सुमेशदेखील एक जिम ट्रेनर आहे.

6 / 6

एका मुलाखतीत शीतलला बबलूसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला असता ती म्हणाली होती, "जमत असेल तर एकत्र राहा, नाहीतर वेगळे राहून आनंदी जीवन जगा." या उत्तरावरून स्पष्ट झालं की ती तिच्या भूतकाळाला मागे टाकून वर्तमान जीवनावर लक्ष केंद्रीत करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us