दोन CNG सिलिंडरच्या या 8 मस्त कार, भरपूर बूट स्पेस, किंमत आणि फिचर्स जाणून घ्या…
भारतात ड्युअल-सिलिंडर सीएनजी कारची लोकप्रियता वाढत आहे. टाटा मोटर्स आणि ह्युंदाईनंतर आता महिंद्रानेही या स्पर्धेत प्रवेश केला आहे.महिंद्रा कंपनीने ड्युअल-सिलिंडर इंजिन असलेली XUV 3XO लॉन्च केली आहे. या कारमध्ये भरपूर बूट स्पेस मिळते. येथे आम्ही तुम्हाला अशाच आठ कारबद्दल सर्व डिटेल्स देत आहोत.

Mahindra XUV 3XO CNG - महिंद्रा XUV 3XO च्या CNG व्हर्जनचे नाव ZNG आहे. यात 1.2-लिटर mStallion G12 टर्बोचार्ज्ड MPFI इंजिन आहे. ते सुमारे 110 hp ची पॉवर आणि 200 Nm चे टॉर्क जनरेट करते. ही कार 0 ते 100 kmph चा वेग केवळ 11.8 सेकंदात पकडते. यात 10.25-इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिझिटल इंस्ट्रूमंट क्लस्टर, इलेक्ट्रिक सनरूफ आणि 16-इंचाचे एलॉय व्हील्स आहेत.किंमत: 9.99 लाख रुपयांनी सुरु
Hyundai Aura CNG - हुंडई ऑरामध्ये 1.2-लिटर कप्पा पेट्रोल इंजिन दिले असून एक तर ते 5-स्पीड म्यॅन्युअल वा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यूनिटसह जोडले आहे. हे इंजिन 83 PS ची पॉवर आणि 113.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. 1.2-लिटर बाय-फ्यूल पेट्रोल इंजिनसोबत CNG व्हर्जन देखील असेल जे 69 PS चे पॉवर आणि 95.2 Nm चा पीक टॉर्क जेनरेट करतो. यात 30 हून अधिक नवीने सेफ्टी फिचर्स आहेत. साईड आणि कर्टन एअरबॅगसह ग्राहकांना 4 एअरबॅग्स स्टँडर्ड आणि 6 एअरबॅग्सचाही ऑप्शन मिळतो. किंमत: 7,81,700 रुपये
Tata Altroz CNG - टाटा अल्ट्रोझला पॉवर देण्यासाठी एक CNG पॉवरट्रेन देखील आहे. ज्यात हे इजिन 73bhp ची पॉवर आणि 103nm चे टॉर्क जनरेट करण्यासाठी ट्यून केले जाते. हे इंजिन 5-स्पीड म्यॅन्युअल गिअरबॉक्ससह येथे. हे केवळ 1.2-लिटर नॅच्युअरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. यात 6-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. या वेंटीलेटेड फ्रंट सिटसह लेदर सिटिंग, 10.25 इंचाचा फ्लोटिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, 10.16 इंचाचा फुली डिझीटल इंस्ट्रूमेंट कंसोल, वायरलेस एंड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्ले सिस्टीम दिली आहे. किंमत: 7,29,990 रुपये
Hyundai Grand i10 Nios CNG - ग्रँड i10 निओसमध्ये 1.2-लिटरचे पेट्रोल इंजिन असून जे 5-स्पीड म्यॅन्युअल वा AMT गिअरबॉक्स सोबत येते. हे कमाल 83 पीएसची पॉवर आणि 113.8 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. i10 निओस मध्ये फर्स्ट-इन-सेगमेंट फिचर उदाहरणार्थ साईड आणि कर्टन एअरबॅग, फुटवेल लायटिंग, टाईप सी फ्रंट USB चार्जर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम मिळते. अन्य अपडेटमध्ये ग्लॉसी ब्लक फ्रंट रेडिएटर ग्रिल, न्यू LED DRLs आणि कनेक्टेड डिझाईनसोबत LED टेल लँपचा समावेश आहे. किंमत: 7,32,700 रुपये
Tata Tiago CNG - टाटा टियागोत 1.2-लिटर इनलाइन थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन असून ते 82bhp ची पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करते.याला 5-स्पीड मॅन्युअल वा AMT गिअरबॉक्सने जोडले आहे. ग्राहकांना यात सीएनजीचा पर्याय दिला आहे.सेफ्टीसाठी ड्युअल-फ्रंट एअरबेग, ABS, EBD, TPMS आणि ESC मिळतात.आता यात अपडेटेड LED हेडलाईट्स आणि DRLs मिळतात. इंटेरिअरमध्ये नवीन कलर स्कीम आहे. मेलेंज फॅब्रिक अपहोल्स्ट्री दिलेली आहे. यात 10.25-इंचाची इंफोटेनमेंट स्क्रीन दिली आहे. किंमत: 5,86,990 रुपये
Hyundai Exter CNG - 1.2 पेट्रोल MT/AMT आणि 1.2 CNG MT इंजिन यात आहे. यात S व्हेरिएंटच्या सर्व फिचर्ससह रिअर पार्किंग कॅमरा, रिअर डिफॉगर, आइसोफिक्स माउंट्स, प्रोजेक्टर हेडलैम्प्स, 15-इंच डुअल-टोन एलॉय व्हील्स, शार्क फिन एंटीना, सनरूफ, पैडल शिफ्टर (AMT केवल) और क्रूझ कंट्रोल (पेट्रोल केवल) सारखे फीचर्स मिळतात. याच्या पेट्रोल व्हेरिएंटचे मायलेज 19 km/l आणि CNG चे मायलेज 27.1 km/kg आहे. याच डॅशकॅम, फ्रंट आणि रिअर मडगार्ड, 8-इंचाचा टचस्क्रीनसह ब्लूलिंक कनेक्टिव्हीटी दिली आहे. किंमत: 6,99,900 रुपये
Tata Aeris CNG - टाटा Aeris (एरिस) 1.2-लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन असून जे पेट्रोल आणि CNG दोन्हींवर चालते. हे इंजिन 86 PS ची पॉवर आणि 113 Nm ची टॉर्क जनरेट करते.तर CNG मोडमध्ये हे 74.47 PS पॉवर आणि 96.5 Nm टॉर्क देते. यात 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स चा पर्याय आहे. यात डे-टाइम रनिंग लँपसोबत LED हेडलँप, 15 इंचाचे हायपरस्टाइल व्हील,वेगवेगळे फ्रंट आर्मरेस्ट, ESP, हिल होल्ड कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमरासह 7-इंचाची इंफोटेन्मेंट सुविधा आहे. किंमत: 6,29,990 रुपये
Tata Punch CNG - टाटा पंच CNG च्या इंजिनात ड्युअल सिलेंडर सेटअपसह 1199cc चे 3-सिलिंडर इंजिन मिळते. जे CNG वर 74hp ची पॉवर आणि 103Nm चा टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जुळलेले आहे. पेट्रोल व्हर्जनसारखा या व्हर्जनमध्ये ड्राइव्ह मोड मिळत नाही. ARAI द्वारा या CNG कारसाठी 26.99km/kg च्या मायलेजचा दावाकेला आहे. पार्किंगसाठी 360-डिग्री कॅमरा, ब्लाईंड व्यू मॉनिटर, ऑटो-डिमिंग IRVM, एक मोठा 10.24 HD टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम यात दिली आहे. किंमत: 6,84,990 रुपये