Photo : 5000 हजाराची साडी 199 रुपयात! पोरं सोडून बायका पळाल्या… कुणी बेशुद्ध पडल्या, तुफान गर्दीसमोर बाऊन्सरही हादरले

सध्या छत्रपती संभाजीनगरमधील एका दुकानाची जोरदार चर्चा रंगली आहे. या दुकानात खरेदीसाठी महिलांनी इतका गोंधळ घातला होता शेवटी दुकान बंद करावे लागले होते.

| Updated on: Jan 05, 2026 | 3:48 PM
1 / 5
छत्रपती संभाजीनगरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतीची ऑफर चर्चेचा विषय ठरली आहे. पाच हजार रुपयांची साडी अवघ्या १९९ रुपयांत मिळणार असल्याचा दावा करणारी रील सोशल मीडियावर व्हायरल होताच संबंधित दुकानाबाहेर महिलांची प्रचंड गर्दी झाली.

2 / 5
खरेदीसाठी दुकानात एकच झुंबड उडाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या गोंधळात तीन महिला बेशुद्ध पडल्या, तर गर्दी आवरण्यासाठी दुकान मालकाला शटर बंद करावे लागले आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले.

3 / 5
पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. खबरदारी म्हणून आज सकाळी दुकान पुन्हा उघडण्यात आले असून बाहेर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने खरेदी सुरू करण्यात आली आहे.

4 / 5
मात्र आजही या ऑफरमुळे दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, दुकान मालकाने नागरिकांना आवाहन केलं आहे की ही ऑफर केवळ मकरसंक्रांतीपुरती नसून वर्षभर सुरू राहणार असल्याने गर्दी न करता शांततेत खरेदी करावी.

5 / 5
सध्या सोशल मीडियावर छत्रपती संभाजीनगर येथील हा प्रकार चांगलाच चर्चेत आहे. अनेक महिलांनी या दुकानातून खरेदी केली आहे. पोलिस आणि सुरक्षारकांच्या मदतीने येथे सर्व काही नियंत्रणात आले.