समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 10 प्रवासी गंभीर जखमी..

नुकताच मोठा अपघात समृद्धी महामार्गावर झाला. तब्बल 10 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतंय. या अपघाताचे काही फोटो आणि व्हिडीओही पुढे आली आहेत.

| Updated on: Aug 31, 2026 | 9:43 AM
1 / 5
समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने पुढे जात असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.

2 / 5
या अपघातात हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय 65, रा. वैजापूर) यांचा मृत्यू झाला आहे. तर ट्रॅव्हल्समधील दहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

3 / 5
अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी प्रवाशांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

4 / 5
भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वेग आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

5 / 5
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चार मोठ्या घटना पुढे आल्या. ज्याचे व्हिडीओही पुढे येताना दिसली. 

Follow Us