देवी लक्ष्मीच्या आग्रहावरुन आई तुळजाभवानीने घेतलेला उखाणा, त्यावर महादेवांची प्रतिक्रिया; रंजक एपिसोड

देवी पार्वतीचा आई तुळजाभवानी रूपातलं हे अत्यंत आनंदी, आल्हाददायक प्रसन्न रूप देवी भक्तांसाठी आवर्जून अनुभवावं असं आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका दररोज रात्री 9 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Feb 28, 2025 | 12:13 PM
1 / 5
कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत देवींच्या वैयक्तिक आयुष्यातला गोड टप्पा उलगडतो आहे. आई तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांचा यमुनांचल पर्वतरांगामधल्या वाड्यातला दैवी सहनिवास सुरू होत आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत देवींच्या वैयक्तिक आयुष्यातला गोड टप्पा उलगडतो आहे. आई तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांचा यमुनांचल पर्वतरांगामधल्या वाड्यातला दैवी सहनिवास सुरू होत आहे.

2 / 5

मोठ्या विरहानंतर शिव- शक्तीच्या पुनर्मिलनाचा अविस्मरणीय क्षण हा येत्या काही भागातले विशेष आकर्षण असणार आहे. महाशिवरात्रीला कैलासावर पंचानन महादेवांचं अलौकिक रूप दर्शन झालं.

3 / 5

त्यानंतर सर्व देवदेवता, भवानीशंकर अवतरातील महादेव, तुळजाभवानी अवतरातील देवी पार्वती यमुनांचल पर्वत रांगांमध्ये परतल्या असून देवींच्या वाड्याच्या प्रवेशाची घटिका जवळ आली आहे.

4 / 5

कल्लोळतीर्थ, गायमुख तीर्थ यांच्या निर्मितीने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या वाड्यात गणेशपूजन आणि वास्तुपूजनाचा देखणा दिमाखदार सोहळा रंगणार आहे.

5 / 5

या सोहळ्याला मेहुणा म्हणून प्रत्यक्ष विष्णुदेव आणि लक्ष्मी उपस्थित आहेत. देवी लक्ष्मीच्या आग्रहावरुन आई तुळजाभवानीने घेतलेला उखाणा आणि महादेवांची त्यावर प्रतिक्रिया हा आवर्जून पाहण्यासारखा रंजक भाग आजपासून येत्या काही भागात उलगडणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us